आरोग्यनामाऑनलाईन – मॉइश्चरायजर लावल्याने सुरकुत्या स्पष्ट दिसत नाहीत. परंतु, वाढत्या वयाबरोबर सुरकुत्याही दिसू लागतात. त्वचा मऊ आणि तलम बनवण्यासाठी मॉइश्चारायजर उपयुक्त असून त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्याची क्रिया पुढे ढकलली जाते. म्हणून मॉइश्चरायजर वापरल्याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत, यात फार तथ्य नसल्याचे तज्ज्ञ सांगातात.
शारीरिक थकवा, ताणतणाव, धूळ, धूर, धूम्रपान, नशा, उष्णता यामुळे सुरकुत्या वाढतात. भरपूर पाणी, पौष्टिक आहार व मॉइश्चझरच्या वापरातून सुरकुत्या येण्याची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलता येते. मॉइश्चरायझर त्वचेत खोलवर जात नसल्याने ते सुरकुत्या टाळण्याऐवजी लपवण्याचे काम करते.
वय वाढते तसे त्वचेवरील ओलावा आणि तलमपणा कमी होऊन त्वचा कोरडी होऊ लागते. या रुक्षपणातून सुरकुत्या तयार होतात. मॉइश्चरायझरसुद्धा सुरकुत्या घालवू शकत नाही. शिवाय उतारवयात येणाऱ्या सुरकुत्या टाळू शकत नाही. त्वचेतील ओलावा टिकवून चेहरा कोमल बनवण्यासाठी मॉइश्चराझर उपयुक्त ठरते.