आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या रोजच्या आहारात वापरली जाणारी हळद ही अनेक आजारांवर गुणकारी आहे हे आपल्याला माहीतच आहे. तसेच कॅन्सरसारख्या अनेक जीवघेण्या आजारांवरही (Curcumin) अतिशय उपयुक्त आहे. कारण हळदीत क्यरक्युमिन हे संयुग असते, ते वेगळे काढून त्याचा वापर कर्करोगग्रस्त पेशी मारण्यासाठी करता येतो. हळदीप्रमाणेच हळदीचा अर्कही (Curcumin) अनेक आजारांवरही उपयुक्त आहे. त्यामुळे हळदीच्या अर्काचे (Curcumin) काय फायदे आहेत, तो कोणते आजार आटोक्यात आणतो. ते आपण जाणून घेऊ.
१) (Curcumin) व काळीमिरी (piperine) यांचा एकत्र वापर केल्याने कॅन्सरग्रस्त पेशींच्या डीएनएचे तुकडे होऊन कर्करोग पेशी मारल्या जातात. त्यामुळे कर्करोगावर आपल्याला नियंत्रण आणता येते.
२) हळदीचा अर्क (Curcumin) हे अँटिऑक्सिडन्ट औषध आहे.
३) आपल्याला जर कुठे जखम झाली तर जखमेच्या वेदना कमी करण्यासाठी आणि ती जखम कोरडी करण्यसाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे.
४) आपल्याला जर खूप मोठी किंवा छोटी जखम झाली असेल आणि त्या जखमेत जर पाणी झालं असेल तर ती जखम खूप वेदनादायी होते. त्या जखमेतील पाणी शोषून घेण्याचे काम हळद करते.
५) अनेक जण सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त असतात. या अतिशय वेदनादायी सांधेदुखीवर हळदीचा अर्क (Curcumin) फार उपयोगी आहे.
६) हळदीचा अर्क (Curcumin) घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
७) हळदीचा अर्क (Curcumin) हे एक अँटिएजिंग औषध आहे. तसेच हे औषध आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी खूप उपयोगी आहे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण रोखले जाते.
८) हल्ली हळदीचा अर्कच्या आयुर्वेदिक कॅप्सूलव टॅबलेट TORCUMIN नावाने सुद्धा बाजारात मिळतात. दोन गोळ्या जेवणानंतर किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास प्रचंड फायदा होतो.