आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या वेळा, आदी कारणामुळे बद्धकोष्ठता होते. परंतु, बद्धकोष्ठता होण्याची इतरही कारणे आहेत. काही विशिष्ट आजारांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. हे आजार नियंत्रणात राहिल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. ज्या आजारांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, ते आजार कोणते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
ही आहेत कारणे :-
१ इन्फेक्शन – आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे स्टूल योग्य प्रकारे बाहेर पडत नाही. यामुळे बद्धकोष्ठता होते.
२ बाउल कॅन्सर – बाउल कॅन्सरमुळे डायजेशन योग्य प्रकारे होत नसल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
३ न्यूरोलॉजिकल कंडिशन्स – न्यूरोलॉजिकल कंडिशन्स म्हणजेच मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा पारकिनसन्सच्या आजारात मज्जासंस्था खराब होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते.
४ हायपोथायरॉयडिजम – यामुळे पचनसंस्था मंदावल्याने पचन योग्य प्रकारे होत नाही, यामुळे बद्धकोष्ठता होते.
५ मधुमेह – मधुमेह झाल्यामुळे पचनक्रिया खराब होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते.
६ इरिटेबल बाउल सिंड्रोम – इरिटेबल बाउल सिंड्रोममुळे बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. या आजारामुळे मोठ्या आतड्यांमध्ये समस्या होते.
७ कोलोन कॅन्सर – कोलोन कॅन्सर झाल्यामुळे पचनक्रिया खराब होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.