आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोणत्याही ऋतूत लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. जाणून घ्या लिंबू पाणी पाण्याचे फायदे.
लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रोज सकाळी उपाशी पोटी लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यावे.
– लिंबू पाणी रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आवश्यक असणाऱ्या कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवते.
– लिंबू पाणी मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॅगनीज असल्याने तणाव मुक्त राहण्यास मदत होते.
– लिंबामध्ये असलेले लॉरिक ॲसिड हे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते आणि चेहऱ्यावर सारखे मुरूम येत असल्यास लिंबू पाण्याचे सेवन करणे उत्तम असते.