आरोग्यनामा ऑनलाईन टीम : बिअर हे जगातील सर्वात जुने आणि लोकप्रिय पेय आहे. गात चहा आणि कॉफी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे पेय म्हणून बिअर ओळखले जाते. हे एक अल्कोहोलिक पेय असून किण्वन प्रक्रियेतून तयार केले जाते. बिअर पिणे तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात कारण अल्पशा प्रमाणात बिअरचे केलेले सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला जाणून घेऊ या बिअर पिण्याचे फायदे.
१ मुतखड्यासाठी फायदेशीर
बिअर पिल्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते. किडनीमध्ये निर्माण होणाऱ्या मुतखड्याला फोडण्याचे काम बिअर करते. बिअरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यासाठी मदत मिळते.
२ त्वचेसाठी फायदेशीर
बिअरमध्ये व्हिटॅमिन ई असते. व्हिटॅमिन ई एक प्रभावी अँटिऑक्सिडेन्ट आहे. निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी बिअर फायदेशीर ठरते. कमी प्रमाणात नियमित बिअरचे सेवन केल्यास त्वचेचे वय कमी होते. त्वचा तजेलदार आणि तेजस्वी राहते.
३ केसांसाठी फायदेशीर
बिअर पिण्यामुळे सौंदर्याचे देखील फायदे मिळतात. बिअर पिणे त्वचेबरोबर केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते. बिअर एक प्राकृतिक हेअर कंडिशनर आहे यामुळे केस मुलायम होण्यास मदत होते. जर तुम्हाला लांब, सुंदर आणि मजबूत केस पाहिजे असतील तर बिअरचे सेवन फायदेशीर ठरते. केसांमध्ये बिअर टाकल्यास केसांमध्ये कोंडा होत नाही.
४ लो कॅलरी, लो कार्बोहायड्रेट्स, नो फॅट नो कोलेस्ट्रॉल
तुम्हाला जर नैसर्गिक पेय प्यायचे असेल तर बीअरचे सेवन करा. यामध्ये लो कॅलरी, लो कार्बोहायड्रेट्स, नो फॅट नो कोलेस्ट्रॉल असल्याने शरिरावर विपरीत परिणाम होत नाही.खराब कोलेस्ट्रॉल कमी कारण्यासाठी अल्पशा प्रमाणात पिलेली बिअर फायदेशीर ठरते. बिअर पिण्यामुळे धमन्या मोकळ्या होतात आणि यकृतातील कोलेस्टेरॉल कमी होते. बिअरमधील कडू घटक चांगल्या कोलेस्टेरॉलला वाढवतो.
.
५ बीअर रिलॅक्स करते –
मध्यम अल्कोहोल असलेले पेय तुमच्या शरिरासाठी चांगले असते. एखाद दुसरी बीअर पिल्याने शरीराला आलेला थकवा कमी होण्यास मदत मिळते.
६ पाण्यापेक्षा सुरक्षित आहे बीअर
स्थानिक बाटलीत मिळणारे पाणी पिऊन आरोग्य खराब करण्यापेक्षा स्थानिक ठिकाणी मिळणारी बीअर केव्हाही पिणे उत्तम. बीअर बनवताना त्यास उकळले जाते आणि बाटलीत बंद होण्याआधी त्यास स्वच्छ ठिकाणी ठेवण्यात येते.
७ हृदय विकाराला करते प्रतिबंध
दिवसातुन साधारण तीन ड्रिंक्स करण्याने २४.७ टक्के हृदय विकाराचा धोका कमी होतो असा ब्रिटिश मेडिकल जरनल १९९९ च्या अभ्यासातुन समोर आले आहे. बिअरमध्ये कार्डियो-प्रोटेक्टिव गुण असतो.
८ बीअर फाइट्स विथ कॅन्सर
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बीअर ही कर्करोगालादेखील फायदेशीर आहे. याच्या सेवनामुळे कर्करोगांच्या जिवाणूंची वाढ होत नाही.