आरोग्यनामा ऑनलाईन टीम –
– कढीपत्ताच्या सेवनाने वजन कमी करण्यात खूप मदत होते. कढीपत्यात असणारे कार्बोल अल्कलॉइड वजन वाढण्यापासून रोखते आणि तसेच शरीरातील कॅलरीचे प्रमाणही नियंत्रित ठेवते.
-कढीपत्त्यात अँटी ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने तणाव कमी करण्यात खूप मदत होते.
– कढीपत्ता मध्ये कार्बोजल एल्कालॉइड जखम लवकर भरण्यात खूप जास्त मदत होते .
– केस गळती थांबवण्यासाठीही कढीपत्याचे तेल उत्तम असते. खोबरेल तेलात कढीपत्ता टाकून गरम करून हे तेल केसांना लावल्याने केस गळती थांबते.
– डोळ्याची नजर कमी असेल तर कढीपत्त्याचे सेवन केल्याने यात खूप चांगला फरक पडतो.
– कढीपत्त्यामुळे पचन प्रक्रियाही सुधारते. गर्भावस्थेतील महिलांनी त्यांना होणाऱ्या सुरुवातीच्या काळातील उल्टी कमी करण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन केल्याने उलट्या होणे कमी होते.