आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सफरचंद हे शरीरासाठी एक उत्तम फळ मानले जाते. अॅपल सिडर व्हिनेगरही शरीरासाठी उत्तम मानले जाते. पण याचे अधिक सेवनही शरीरासाठी धोका निर्माण करू शकते.
– अॅपल सिडर व्हिनेगरचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने जास्त प्रमाणात डोके दुखी होऊ शकते. यामुळे मळमळ होण्याचा ही त्रास होऊ शकतो.
– अॅपल सिडर व्हिनेगरचा अधिक प्रयोग केल्यास याचा शरीरतील रक्तात वाईट परिणाम होऊ शकतो. अॅपल सिडर व्हिनेगर रक्तातील साखरेचा प्रमाण कमी करतो यामुळे लो शुगर होण्याची शक्यता असते.
– अॅपल सिडर व्हिनेगरचा अधिक सेवन केल्याने शरीरातील हाडांमधील खनिजचे प्रमाण कमी होते. यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात.
– अॅपल सिडर व्हिनेगरचा उपयोग त्वचेवर केल्याने त्वचेवर खाज येणे, जळजळ होणे आणि रॅशेस होण्याची शक्यता असते.
– अॅपल सिडर व्हिनेगरचा डायरेक्ट उपयोग शरीरासाठी हानीकारक असतो. यामुळे नेहमी अॅपल सिडर व्हिनेगरचा उपयोग पाण्यात मिसळून करावा.