आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहरा, हात-पाय यांची आपण खूप काळजी घेतो. मात्र, त्या तुलनेत डोळ्यांची (Eyes) काळजी घेत नाही. खरं तर डोळे (Eyes) हा शरीराचा अतिशय नाजूक आणि अतिशय महत्वाचा भाग आहे. याच्याकडे दुर्लक्ष केल्यास नजर कमजोर होण्याची शक्यता असते. डोळ्यांची काळजी घेतली नाही तर ते लवकर खराब होऊ होतात. आपल्याकडून होत असलेल्या काही चुकांमुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. या आठ चूकांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
सतत स्क्रीन पाहणे
रोज कम्प्यूटर, मोबाइल किंवा टीव्ही स्क्रीन सतत, तासंतास पाहिल्याने डोळे खराब होऊ शकतात. यासाठी प्रत्येक २० मिनिटाला डोळ्यांना आराम द्या आणि स्क्रीनपासून २ फूट अंतरावर बसा.
आय मेकअप
रात्री झोपण्यापुर्वी आय मेकअप न काढल्याने यामधील केमिकल्सचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यामुळे डोळ्यांमध्ये इरिटेशन, अॅलर्जी, इन्फेक्शन, खाज, जखम आणि लाल होण्यासारखी समस्या होते.
काजळ
चांगल्या दर्जाचे काजळ न लावल्याने डोळ्यांमध्ये इन्फेक्शन आणि अॅलर्जी होते.
एक्सपायर औषधे
डोळ्यांसाठी एक्सपायर औेषधांचा उपयोग केल्याने इरिटेशन आणि अॅलर्जीसारखी समस्या होऊ शकते.
डोळे चोळणे
हातांनी डोळे चोळल्याने हातांचे बॅक्टेरिया डोळ्यांमध्ये जातात. यामुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन आणि अॅलर्जीचा धोका वाढतो.
स्वच्छता
दिवसातून कमीत कमी २-३ वेळा डोळे पाण्याने स्वच्छ करावेत. अन्यथा इन्फेक्शनचा धोका वाढतो. याचा नजरेवर प्रभाव पडतो.
चष्मा
बाहेर पडताना किंवा बाइक चालवताना चष्मा न लावल्याने डोळ्यांमध्ये धूळ आणि किडे जाऊ शकतात. यामुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन आणि अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते.
कॉन्टेक्ट लेन्स
कॉन्टेक्ट लेन्स रात्री लावून झोपू नका. यामुळे डोळ्यांना ऑक्सीजन मिळत नाही. यामुळे धुसर दिसणे, डोळे लाल होणे, वेदना होणे अशा समस्या होतात.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे