आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नकळत होणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. कारण ते तुमच्या जीवावरही बेतू शकते. आपल्याला थोडा त्रास होत असेल तर आपण जाऊद्या एवड काही नाही. दुखत असेल असच असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्या छोट्या त्रासावर जर वेळीच उपचार घेतले नाही तर ते आपल्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण करते.
नकळत होणाऱ्या या वेदना सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षणही असू शकतात. कधी कधी अचानक आपल्या छातीत चमक निघते. किंवा वेदना होतात. पण पित्त झालं असेल त्यामुळं होत असेल असं म्हणून आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. यासारख्याच दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या नकळत होणाऱ्या वेदना आहेत. कि ज्या सायलेंट हार्ट अटॅक लक्षण असतात.
परंतु, आपल्याला वाटत कि, हार्ट अटॅक आला तर छातीत खूप जोरात दुखत. किंवा मग चक्कर येऊन पडत.आणि तोच हार्ट अटॅक असतो. त्यामुळे आपण या शुल्लक गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जाणून घ्या या नकळत घेणाऱ्या वेदना कोणत्या ज्या तुमच्या जीवाला धोका पोहचवू शकतात.
१) जर तुमच्या छातीवर दबाव आल्यासारखं होत असेल. तर तुमच्या छातीत ब्लॉकेज असण्याची दाट शक्यता असते. तसेच छातीत वेदना होत असतील तर, हि तुमच्यासाठी गंभीर बाब आहे.
२) कधीकधी खांदे आणि हातात वेदना होतात. आणि छातीतही चमक निघते. तर कधी फक्त हात आणि खांदेच दुखतात. हे पण हार्ट अटॅकच लक्षण असू शकत.
३) कधी कधी आपल्याला अशक्तपणा जाणवतो. आणि चक्कर येते. असं जर होत असेल तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. कारण हा तुमच्या साठी धोक्याचा इशारा आहे.
४) कधी जर छातीच्या मधोमध वेदना होत असतील आणि तोच त्रास जर जबड्याकडे जात असेल तर याबद्दल तात्काळ कुटुंबियांना सांगा. कारण हा त्रास तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे.
५) जर तुमच्या पायावर सूज येत असेल तर याचा अर्थ तुमंच हार्ट योग्य पद्धतीने ब्लड पंप करू शकत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. अशा प्रकारची जर काही लक्षण जाणवत असतील तर लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.