आरोग्यनामा ऑनलईन टीम- बियरने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते परंतु आपल्याला माहितीच आहे की कोणत्याही गोष्टीचं अधिक सेवन हानिकारक आहे. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त बियर पित असाल तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तुम्ही अनेक समस्यांना निमंत्रण देत आहात. अनेक लोकांना याबाबत माहिती नसेल की, बियरने काय नुकसान होऊ शकते. याच नुकसांनांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1) ब्लड शुगर वाढते- बियर पिल्याने तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढते. बियर लिवरमधील संग्रहीत ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर करते आणि ब्लड स्ट्रीममध्ये रिलीज करते. बियरमधील अल्कोहोल या प्रक्रियेत हस्तक्षेप करते. यामुळे तुमची भूकही वाढते.
2) अधिक कॅलरीज- बियरमध्ये अधिक कॅलरीज असतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही हानिकारक आहे. कारण बियरमध्ये उपस्थित अल्कोहोल लिव्हरकडून एसीटेटमध्ये बदलल जातं. जे हिप्स आणि पोटावर जमा केलं जातं.
3) हृदयाच्या आजारांचा धोका- काही अभ्यासातून हे समोर आले आहे की, बियर पिणं हदयासाठी चांगलं आहे. परंतु जर तुम्ही प्रमाणात पित असाल तरच. ज्याला हृदयरोग आहे त्याला बियर पिल्याने कोणताही फायदा होत नाही. यामुळे उलट हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होईल.
4) हार्ट बर्नची समस्या वाढते- बियरमध्ये असे काही उत्तेजक पदार्थ असतात जे गॅस्ट्रीक अॅसिड सोबत काम करतात. त्यामुळे गॅस्ट्रो ओएसोफेगल रिफ्लक्सची सुरुवात होते आणि याचा परिणाम असा होतो की, यामुळे हार्ट बर्न होण्याची शक्यता वाढते.