अमेरिकन डॉक्टरांनी केलं ‘ घड्याळाद्वारे ‘ हृदयरोगाचे निदान
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डॉक्टरांनी एखाद्या रुग्णावर शस्रक्रिया करून त्यांच्या रोगाचे निदान केले असे आपण अनेक ऐकले असेल पण अमेरिकेत एका डॉक्टरने एप्पल वॉच सीरीज ४ या घड्याळामुळे एका रुग्णाच्या शरीरातील आर्टरी फाइब्रिलेशन (ए-फिब) च निदान झालं. त्यामुळे डॉक्टरांना त्या रुग्णाचा जीव वाचवण्यात यश आले. आर्टरी फाइब्रिलेशन एक खूप घातक अवस्था आहे. याच्यावर काहीच उपचार केला जाऊ शकत नाही.
यामुळेच कधीकधी हार्ट अटॅक पण येऊ शकतो. आणि यात व्यक्तीला काहीच त्रास होत नसल्यामुळे अटॅक आलेला जाणवतही नाही. मात्र ही वॉच माणसाच्या हृदयातील स्थिती जाणते. आणि त्या व्यक्तीच्या हृदयातील स्थिती माहित झाल्यामुळे तो व्यक्ती हृद्यरोगाच्या धोक्यापासून वाचू शकतो. एखाद्या रोगाचे निदान करण्यासाठी इसीजी मशीन शोधण्यापेक्षा जर ही वॉच त्या व्यक्तीच्या हातावर ठेवली.
तर ती लगेच त्या व्यक्तीच्या हृदयाची अवस्था दाखवते. असे ट्विट नेत्र विशेषज्ञ टॉमी कोर्न यांनी केले. हे वॉच अमेरिका, युरोप,हॉंगकॉंगमध्ये अनेक नागरिकांना त्यांच्या हृदयाची स्थिती दाखवतो. त्यामुळे त्या नागरिकांना त्यांच्या हृदयाच्या ज्या हालचाली आहेत त्या ते लगेच डॉक्टरांना सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या हृदयाच्या रोगाचे प्रमाण कमी होत आहे.