तणावमुक्त आणि निवांत झोपेसाठी करून पाहा ‘हे’ साधेसोपे ४ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराला शांत आणि पूर्ण झोप खूप आवश्यक असते. यावर शरीराचे आरोग्य आवलंबून असते. मात्र, झोप पूर्ण न मिळाल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव शरीर आणि मनावर पडतो. निरोगी राहण्यासाठी शांत झोप आवश्यक आहे, असे जगभरातील संशोधक सांगतात. झोप पूर्ण होत नसेल तर याचे कोणते वाईट परिणाम शरीरावर होतात. हे कोणते परिणाम आहेत व यावर उपाय कोणते करावेत, याविषयी जाणून घेवूयात.

हे परिणाम होऊ शकतात

व्यक्तीचे रूप आणि त्वचा खराब होते.
भूक जास्त लागल्याने ओव्हरइटिंगचा धोका वाढतो.
अपघातांचा धोका तीन पटीने वाढतो.
सर्दी होण्याचा धोका तीन पटीने वाढतो.
डोकेदुखीची शक्यता आणखी वाढते
झोप पूर्ण न झाल्यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो.
स्ट्रोकचा धोका चार पटीने वाढतो.
डायबिटीज होण्याची शक्यता वाढते.
विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
१० हृदयाच्या आजाराचा धोका ४८ टक्क्यांनी वाढतो.
११ कमी झोपेचा ब्रेन टिश्यूवर जास्त प्रभाव पडतो
१२ कामाच्या ठिकाणी प्रोडक्टिविटी कमी होते.

पूर्ण झोपेचे फायदे 

मेंदू तल्लख
लठ्ठपणावर नियंत्रण राहते
त्वचा उजळते
आयुष्य वाढते

हे उपाय करा

रात्री कमी जेवण करा

निवांत झोपण्यासाठी रात्रीचा आहार कमी करा. जास्त खाल्ल्याने पाचन तंत्रावर भार पडतो. झोपण्याच्या एक-दीड तास अगोदर हलके अन्न घेतल्यास शांत झोप लागते. रात्री पाणी कमी प्रमाणात प्यावे, यामुळे वारंवार लघवीसाठी उठावे लागणार नाही.

कॅफिन घेऊ नका
रात्री झोपण्याच्या एक ते दोन तास आधी चहा-कॉफीचे सेवन करू नका. कारण कॅफिनमुळे झोप येत नाही. कॅफिन हे कॉफीसह चहामध्येही असते.

तणाव दूर करा
झोप न येण्याची भीती हे निद्रानाशाचे कारण असते. दिवसभर केलेल्या कामाचा तणावामुळे रात्री वारंवार झोप मोडते. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक तणाव चांगल्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करतात. यासाठी जावळे मित्र, कुटुंबातील सदस्य, पती, पत्नीशी यावर चर्चा करा.

विचार करू नका
झोपताना कोणताही विचार न करता शांत झोप कशी येईल हे पाहावे. जास्त वेळ टी.व्ही. पाहणे टाळावे. दुपारी झोपेचे तास भरून काढणे चूकीचे आहे. कारण असे केले तरी जागरणाचे दुष्परिणाम होतातच.