मुलींनो, पावसाळ्यातही सौंदर्य टिकवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात महिलांना मेकअपची चिंता सतावते. या काळात कसा मेकअप करावा हेच समजत नाही. मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी त्या विविध प्रयत्न करत असतात. खरं तर पावसाळ्यात मेकअप करू नका असेच सुचवले जाते, कारण दमटपणा वाढल्याने मेकअपमुळे शरीरावर डाग पडण्याची शक्यता असते. परंतु, काही महिलांना मेकअपशिवाय राहणे शक्य नसते. या काळातही महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप करू शकतात. मात्र, त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
वॉटरप्रूफ मेकअप
पावसाळी वातावरणात अत्यंत कमी आणि वॉटरप्रूफ मेकअप करावा. मेकअप करण्याआगोदर एस्ट्रेीजेंटचा वापर करावा. यामुळे त्वचेवरील छिद्र उघडतात आणि चेहरा फ्रेश दिसतो. वॉटरप्रूफ मेकअप साधारण मेकअपपेक्षा थोडा महाग असतो. पण त्यामुळे चेहरा ताजातवाना दिसतो. पावसात भिजल्यावरही वॉटरप्रूफ काजळ, आय लायनर आणि मस्करा तसेच राहते.
ही काळजी घ्या
* पावसाळ्यात मेकअप अधिक काळ टीकत नसल्याने फाऊंडेशनचा वापर करू नये. त्याऐवजी लूज पावडर अथवा कॉम्पॅक्ट पावडर वापरावी. अशा वातावरणात छिद्र बंद झाल्याने त्वचा श्वास घेऊ शकत नाही. यामुळे कॉम्पॅक्ट पावडर वापरावी.
* फाऊंडेशन लावायचे असल्यास त्वचेनुसार योग्य फाऊंडेशन निवडाावे. हे फाऊंडेशन थेट चेहऱ्यावर लावण्याआगोदर कापसाच्या साह्याने सुरूवातीला एस्ट्रींजेंट लोशन लावावे. त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यात बर्फाची वडी घेऊन ती संपूर्ण चेहऱ्यावरून फिरवावी. त्याच बरोबर चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाटी कंसीलरचा वापर बंद करावा. डार्क सर्कल जर खुपच जास्त असतील, तर त्याला लपवण्यासाठी वॉटरप्रूफ फाऊंडेशनचा वापर करावा.
* पावसाळ्यात मॅट फिनिशच्या प्रॉडक्टचा वापर करावा. वॉटरप्रूफ अथवा ट्रान्सपरंट मस्करा वापरावा. आय शॅडो लिक्वीड बेस्ड वापरू नये. पावडर आयशॅडोचा वापर करावा.
* आय लायनर, आय शॅडो आणि काजळ लावल्याने चेहरा खराब दिसू शकतो. वॉटरप्रूफ पेन्सीलच्या काजळचाच वापर करावा. आयब्रोला शेपमध्ये ठेवण्यासाठी आयब्रो पेन्सीलऐवजी ट्रीमिंग, थ्रेडींग, प्लकिंग अथवा वॅक्सींग करावी.
* ओठांसाठी जास्त काळ टिकणारी वॉटरप्रूफ लिपस्टीक वापरावी. क्रीमी आणि ग्लॉसी लिपस्टीकचा वापर करू नये. मॅट फिनिश लिपस्टीकचा वापर करावा. तसेच ट्रान्सपरंट लिप ग्लासचा वापरही करता येईल. लिपस्टीक लावण्याआगोदर आऊटलाईन बनवण्यासाठी लाईट रंगाच्या लिप लायनरचा वापर करावा.
* लिपस्टीक ब्रशनेच लावावी. ओठ फाटलेले असतील, तर ते मऊ करण्यासाठी त्यांच्यावर मध, लोणी, साय अथवा व्हॅसलीन लावावे. यानंतर चांगल्या क्वालीटीचे लिपस्टीक लावावे.
Comments are closed.