आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डिमेंशिया हा मेंदुशी संबंधीत आजार आहे. मेंदु हा शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीराची प्रत्येक क्रिया ही मेंदुच्या सुचनेनुसारच होत असते. त्यामुळे मेंदुचे आरोग्य खुप महत्वाचे ठरते. डिमेंशिया हा मेंदुशी संबंधीत आजार असून यास स्मृतिभ्रश असे म्हटले जाते. या आजाराबाबत अनेकांना जास्त माहिती नसते. यासाठी आपण यासंबंधी सविस्तर माहिती घेणार आहोत.
हे आहेत परिणाम
* दैनंदिन जीवनात घडून गेलेल्या गोष्टी आठवत नाहीत. काय जेवण केले, आपण कुठे राहातो, हे देखील लक्षात राहात नाही.
* डिमेंशियाने पीडित व्यक्तीच्या मेंदूवरील काही सुरकुत्या पुसल्या जातात. अशा व्यक्तिची विचार करण्याची शक्ती लोप पावते.
* रूग्णाच्या स्वभावातही बदल झालेला जाणवतो.
ही आहेत कारणे
* ब्लड प्रेशर, डायबीटीज, स्मोकिंग, ट्यूमर, टीबी, स्लीप एप्निया, व्हिटामिनच्या कमतरतेमुळे स्मृतीभ्रंश होतो.
* औषधींच्या अतिसेवनामुळे तसेच साइड इफेक्टमुळे होतो.
* स्मृतीभ्रंश झाल्यास न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.