आरोग्यनामा ऑनलाईन टीम – किवी या फळाची शेती भारतात केली जात नाही. त्यामुळे आपल्याला या फळाविषयी जास्त माहिती नाही. परंतु हे फळ संत्र्यापेक्षाही जास्त फायदेशीर आहे. कारण या फळातून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात सी जीवनसत्व मिळते. तसेच कॅन्सर आणि डायबेटिज सारख्या आजारांवर किवी हे फळ नियंत्रण आणते. आणि बाकीच्या इतर आरोग्याच्या समस्येबाबतही किवी फायदेशीर आहे. त्यामुळे या फळाचे सेवन केल्याने खूप फायदे होतात.
किवी या फळाचे फायदे खालीलप्रमाणे :
१) किवीमधील पोषक तत्वे डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात.
२) हृदयाच्या आरोग्यासाठी किवीचा फायदा होतो.
३) कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.
४) किवी फळ खाल्ल्यानं ब्लड शुगर कमी होतं. तसेच दिवसभरातील थकवा दूर होतो. फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे.
५) पचनक्रिया सुधारण्यासही किवी गुणकारी ठरते.
६) किवीचा उपयोग शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी होतो.
७) त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी किवी उपयुक्त ठरतं. तसेच किवीचा फेसपॅकही त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.