आरोग्यानामा ऑनलाइन टीम : सतत रडणारी लहान मुले आपण अनेकदा पाहतो. अशा मुलांवर आई-वडीलदेखील रागवतात. परंतु, यामध्ये मुलांची काहीच चुक नसते. मुलांची झोप पूर्ण होत नसेल अथवा त्यांचे दुधाने पोट भरत नसल्यास ती नेहमी किरकिर करतात. जी मुले पुरेशी झोप घेतात, पोटभर दूध ज्या मुलांना मिळते ती कधीही किरकिर करत नाहीत. या किरकिरीचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
हे लक्षात ठेवा
१ झोप आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे.
२ मुलांना योग्य आणि ठराविक वेळी झोपवा. यामुळे त्यांची झोप पूर्ण होऊन त्यांना पुरेसा आराम मिळतो.
३ अपूर्ण झोपेचा मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. भविष्यातही त्यांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
४ अपुरी झोप मिळत राहिल्यास मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. अटेन्शन स्पॅन कमी होतो.
५ अभ्यासावर परिणाम झाल्याने ती मागे पडू शकतात.
६ अशा मुलांचा सामाजिक सहभाग कमी असतो. मुले एकलकोंडी होऊ शकतात.
७ अशी मुले कायम किरकिरी आणि चिडचिडी राहतात.
Visit : arogyanama.com