आरोग्यानामा ऑनलाईन टीम : किडनी स्टोन असताना काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेकांना महिती नसते. त्यामुळे ही समस्या आणखी वाढत जाते. यासाठी योग्य ती माहिती असणे खुप गरजेचे ठरते. किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यापैकी खाण्या-पिण्याच्या सवयी हे महत्वाचे कारण आहे. मीठ आणि शरीरातील इतर खनिज जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा किडनी स्टोन होतो. ही खुपच वेदनादायक समस्या आहे. यामध्ये कोणते पदार्थ खाऊ नयेत ते जाणून घेवूयात.
हे पदार्थ खाऊ नयेत
1 मीठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. वरुन मीठ घेणे टाळा.
2 कॅल्शिअम कमी प्रमाणात घ्यावे.
3 कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक अजिबात सेवन करु नका.
4 किडनी स्टोन असताना मद्यपान करु नये.
5 कोल्ड ड्रिंक्स, मांस, मासे खाऊ नये. फळांमध्ये स्ट्रॉबेरी, बोरं, अंजीर, किशमिश हे खाऊ नये.
6 दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ जसे की, दही, पनीर, टॉफी, कॅन सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड, चिप्स आणि चहाचे जास्त सेवन करु नये.
7 टोमॅटो, पालक, चवळी, द्राक्ष, सोयाबीन, सोया मिल्क, चीकू, काजू, चॉकलेट, उडीद, चणे, शेंगदाणे कमी प्रमाणात सेवन करावे.
8 किडनी स्टोन असताना मांस, मासे, वांगी, मशरुम, फ्लॉवर खाऊ नये.
Visit : arogyanama.com