Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, त्याच्या मदतीने रक्तातील घाण गाळली जाते, त्याचप्रमाणे शरीरात शुद्ध रक्तप्रवाहासाठी किडनी महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा किडनीच्या (Kidney) कार्यामध्ये थोडीशी समस्या येते, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर स्पष्टपणे दिसू लागतो. किडनी इन्फेक्शन, किडनी फेल्युअर (Kidney Infection, Kidney Failure) यांसारख्या समस्यांमुळे जीवघेण्या समस्याही निर्माण होतात. त्याची लक्षणे वेळीच ओळखणे फार महत्वाचे आहे. किडनी खराब (Kidney Damage) झाल्यावर आपले शरीर कसे इशारा देते ते जाणून घेऊया (Kidney Disease Warning Sign).

 

1. थकवा वाढणे (Fatigue Increases)
किडनीच्या फिल्टर प्रक्रियेत अडथळे आल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. त्यामुळे अशक्तपणा येऊ लागतो आणि थकवाही जाणवू लागतो.

 

2. झोपेचा अभाव (Sleep)
किडनीच्या कार्यामध्ये अडथळे आल्याने आपल्या झोपेवर परिणाम होतो, त्यामुळे निद्रानाशाची (Insomnia) समस्या निर्माण होते. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

 

3. खाज सुटणे (Itching)
जेव्हा किडनीच्या (Kidney) समस्येमुळे विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाही, तेव्हा ही घाण रक्तात जमा होऊ लागते आणि त्यामुळे त्वचेला खाज सुटते.

4. लघवीच्या रंगात बदल (Urine)
जेव्हा किडनी खराब होते तेव्हा जास्त प्रोटीन बाहेर पडू लागतात. त्यामुळे लघवीचा रंग पिवळा किंवा गडद होऊ लागतो, अनेक वेळा लघवीतून फेस आणि रक्तही येऊ लागते.

 

5. चेहरा आणि पायावर सूज (Swelling on face and feet)
जेव्हा किडनी शरीरातून सोडियम काढू शकत नाहीत, तेव्हा ते शरीरातच जमा होऊ लागते. त्यामुळे पाय आणि चेहर्‍याला सूज येऊ लागते.

 

6. स्नायू पेटके
किडनी निकामी झाल्यामुळे पाय आणि स्नायूंमध्ये क्रॅम्प्स सुरू होतात. कारण सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम (Sodium, Calcium, Potassium) किंवा इतर इलेक्ट्रोलाईट्सच्या पातळीत असंतुलन होऊ लागते.

 

7. श्वास लागणे
जर तुम्हाला वारंवार श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर ते किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. कारण अशा परिस्थितीमुळे रेथ्रोपोएटिन नावाच्या हार्मोनच्या उत्पादनावर परिणाम होतो, हे हार्मोन्स आरबीसी बनवण्यास मदत करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth

 

हे देखील वाचा

 

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

 

High Cholesterol | ‘हे’ ड्रिंक गरम करून पिण्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला होतील 8 जबरदस्त फायदे

 

 

Disadvantages of drinking cold water | जेवल्यानंतर थंड पाणी पिणार्‍यांनी व्हावे सावध, आरोग्याचे होते हे 5 प्रकारचे गंभीर नुकसान