आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुतखडा (किडनी स्टोन) असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात काही बदल केल्यास या समस्येवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. शिवाय, मुतखड्याच्या वेदना होत असतील तर काही घरगुती उपायही करता येऊ शकतात. भरपूर प्रणामात ऑक्सेलेट्स असलेले खाद्य पदार्थ म्हणजेच चॉकलेट, पालक, स्ट्रॉबेरी आणि कॉफी यांचे सेवन केल्यानेसुद्धा मुतखड्याचा धोका वाढतो.
मोठ्याप्रमाणात द्रव पदार्थांचे घेतल्या किडनी अनावश्यक खनिज बाहेर फेकते. यामुळे मुतखड्याचा आकार वाढू शकत नाही. हा त्रास होऊ नये म्हणून सोडा आणि अल्कोहोलयुक्त द्रव पदार्थांपासून दूर राहावे. जेवणात जास्त पोषक द्रव्यांचा समावेश करू नये. कारण यामुळे युरिक अॅसिडची अधिक निर्मिती होते. तसेच जेवणामध्ये मीठ आणि नायट्रोजन यांचा मर्यादित प्रमाणातच समावेश केला पाहिजे. मुतखड्याचा त्रास असणाराने भरपूर प्रमाणात नारळ पाणी प्यावे. यामुळे स्टोन तुटायला लागतो आणि लघवीवाटे निघून जातो, असे तज्ज्ञ सांगतात. गाजर, रताळे आणि जर्दाळू यांचे सेवन केल्यास या त्रासात लाभदायक आहे. यातून भरपूर प्रमाणात अ जीवनसत्त्व मिळते. मुतखडा असल्यास फॉस्फेट आणि कॅल्शियम सप्लिमेंट्सचे सेवन करू नये. तसेच क जीवनसत्त्वाचे सप्लिमेंट्सही घातक ठरू शकतात.
मुतखडा असणारांनी हे खाऊ नये
* चॉकलेट, पालक, स्ट्रॉबेरी आणि कॉफी
* सोडा आणि अल्कोहोल
* जेवणामध्ये मीठाचे प्रमाण कमी असावे
* फॉस्फेट आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घेऊ नये
मुतखडा असणारांनी हे खावे
* भरपूर प्रमाणात नारळ पाणी प्यावे
* गाजर, रताळे आणि जर्दाळू खावेत