‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा 

July 30, 2019
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल किडनी स्टोनच्या  रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. जड पाणी आणि क्षारयुक्‍त पाण्‍यापासून तयार झालेले पदार्थ आहारात घेतल्‍यानंतर किडणी स्‍टोन होण्‍याचा धोका जास्‍त असतो. लघवीत  कॅल्शियम ऑक्झिलेट किंवा इतर क्षारकण  एकमेकांच्यात मिसळल्यानंतर काही काळानंतर हळूहळू मुत्रमार्गात कठीण पदार्थ ,खडे  तयार व्हायला लागतात हे कठीण पदार्थ म्हणजेच किडनी स्टोन. काही पदार्थांमध्ये ऑक्झिलेटचं प्रमाण जास्त असतं. ते शरीरातल्या कॅल्शियमसोबत मिसळून त्याचे खडे तयार होतात. या आजारामध्ये रुग्णाला प्रचंड  वेदना सहन कराव्या लागतात. जाणून घ्या असे कोणते पदार्थ  किडनी स्टोनच्या रुग्णांनी आहारातून वर्ज्य करावेत किंवा कमी प्रमाणात घ्यावे.

१) पालक, चुका,  दूध, कोबी, काजू, चॉकलेट , भेंडी  या पदार्थांमध्ये ऑक्झिलेट या घटकाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी हे पदार्थ कटाक्षाने टाळावेत.

२) मटन व काही प्रकारच्या माशांमध्ये ऑक्झिलेट प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोनच्या  रुग्णांनी मांसाहार पूर्णपणे  टाळावा.


३)
चहा प्यायल्याने खड्याचा आकार अधिक वाढायला लागते. त्यामुळे चहा कमी प्रमाणात प्या किंवा टाळाच.


४) बीट आणि  टोमॅटोमध्येही ऑक्झिलेटचं प्रमाण जास्त असतं.


५) मीठामध्ये असणारं सोडियम शरीरात गेल्यावर कॅल्शियममध्ये रुपांतरीत होतं आणि त्याचे खडे होण्यास सुरुवात होते. त्यामुळे  मीठाचे सेवन अल्प प्रमाणात करा.


६) अधिक प्रमाणात कोल्ड्रिंक्सचे सेवन करू नये.


७) व्हिटॅमिन-सी जास्त असलेले पदार्थ टाळावेत. उदा. आवळा