आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामाच्या धावपळीत आपण केवळ आपल्याच फ्रेशनेसचा विचार करतो. परंतु, आपले कपडेसुद्धा (Clothes) नेहमी फ्रेश असणे गरजेचे आहे. कारण अनेकदा धावपळीमुळे कपड्यांना घामाचा वास येतो. यामुळे आपले इंप्रशेन डाऊन होऊ शकते. कपड्याचा (Clothes) फ्रेशनेस जपण्यासाठी काही सोपे उपाय असून त्याबाबत जाणून घेऊयात.
हे लक्षात ठेवा
१) कपड्यांच्या कपाटात नेहमी सुगंधी साबण ठेवा. यामुळे कपड्यांना चांगला सुगंध येतो. तसेच कपाटात रुम फ्रेशनर वापरल्यास कपड्यांना खराब वास येत नाही.
२) कपडे रोज धुवा. एक दिवस कपडे वापरले तरी त्यांना घामाचा वास येतो.
३) कपडे धुण्यासाठी सुगंधी साबण किंवा पावडर वापरल्याने ते फ्रेश राहतात.
४) नेहमी स्वच्छ ठिकाणी कपडे ठेवा. खराब ठिकाणी कपडे ठेवल्याने खराब वास येतो. कपाट स्वच्छ ठेवा. यामुळे कपड्यांना खराब वास येणार नाही.
५) ओलसर कपडे कपाटात ठेवू नका. ते हॅँगरवर लटकवा. दोन ओले कपडे शेजारी-शेजारी ठेवू नका.
६) कपड्यांचे कपाट सतत बंद ठेवू नका. कारण बंद ठेवल्यास कपड्यांना कोंदट वास येतो. काही वेळ कपाट उघडे ठेवा.
Dengue symptoms | Dengue virus | डेंग्यू म्हणजे काय? लक्षणे कोणती? उपचार जाणून घ्या
Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे