आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणताही आजार हा चूकीच्या जीवनशैलीमुळे होत असतो. यात सुधारणा केली, तर आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगता येते. वाईट सवयीमुळे लाइफ स्टाइल डिसीजेसचा धोका सध्या वाढत चालला आहे. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर, पक्षाघात, पल्मोनरीसारखे आजार यामुळे होतात. जीवनशैली सुधारली आणि वाईट सवयी सोडल्या तर हे आजार दूर ठेवता येणे सहज शक्य आहे.
आर्थिक स्थिती
आर्थिक दबावाने उच्च रक्तदाब, इनसोमनिया, अपचन, धूम्रपानासारख्या समस्या वाढतात. यासाठी मर्यादेत खर्च करा. आर्थिक व्यवहार सरळ ठेवावेत. कर्ज कमी केल्याने शरीरावरील भार कमी केल्यासारखा आनंद होतो. जास्त खर्च टाळून पैशाच्या काळजीपासून सुटका मिळते.
सकाळी नाश्ता करा
सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत नाश्त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सकाळी नाश्ता न केल्यास वजन, ऊर्जापातळी आणि रक्तातील शुगर लेव्हलवर नकारात्मक परिणाम होतो. नाश्त्याची सवय नसल्यास चयापचय प्रक्रिया मंदावते. यामुळे वजन वाढते. तसेच विविध आजार होण्याची शक्यता वाढते.
चिंता सोडून द्या
लहान-लहान गोष्टीने त्रस्त होण्याची सवय अनेकांना असते. लहान-लहान गोष्टीवर राग येणार नाही, काळजीही वाटणार नाही, असा स्वभाव करून घ्या. काळजीमुळे स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात. परिणामी ब्लड शुगर, रक्तदाब, प्रतिकार क्षमता, पचन प्रक्रियेवर विपरीत प्रभाव पडतो.
जास्त टीव्ही पाहणे
जास्त टीव्ही पाहिल्याने शारीरिक हालचाल कमी होतात. दोन तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहणारे हे टीव्ही न पाहणाèयांच्या तुलनेत सॉफ्ट ड्रिंक, उच्च कॅलरी आणि फॅट्स फूड जास्त खातात. जास्त टीव्ही पाहणे आणि जास्त खाणे दोन्ही आरोग्याच्या दृष्टीने घातक असते.
व्यसन सोडा
सिगरेट आणि दारूच्या व्यसनाने गंभीर आजार होऊ शकतात. धूम्रपानामुळे कॅन्सरचा तर अल्कोहोलच्या व्यसनामुळे यकृताच्या आजारांचा धोका असतो. या व्यसनांमुळे विविध प्रकारचे कॅन्सर होतात. म्हणून उत्तम जीवनशैलीसाठी व्यसनांपासून दूर राहावे.
खाण्यावर नियंत्रण
भूक नसतानाही स्नॅक्स खाणे यास ओव्हरइटिंग म्हणतात. ही सवय नैसर्गिक भुकेला आणि तृप्ततेच्या संकेताला नाहीसे करते. चटपटीत खाण्यामुळे लठ्ठपणा वाढतो. मधुमेह आणि हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढतो. स्नॅक्स म्हणून जंक फूड्स घेत असल्यास ही सवय आणखी धोकादायक होते.
ही काळजी सुद्धा घ्या
* इंटरनेटचा मर्यादित वापर करा. दिवसभर संगणक आणि मोबाइलमध्ये व्यग्र राहिल्याने चिडचिडेपणा वाढतो. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.
* शक्यतो औषधे टाळा. डोकेदुखी किंवा सर्दी अशा लहान आजारावर वारंवार औषधे घेऊ नका.
* दररोज कमीत कमी ६ तास झोप घ्यावी. कमी झोपल्यामुळे हृदयाला सर्वात जास्त धोका निर्माण होतो.
* एकटेपणापासून दूर रहाण्यासाठी लोकांमध्ये मिसळत राहा. आयुष्यात एकटेपणा हा सिगारेट पिण्याएवढाच धोकादायक आहे.
* रेडमीटचा आहारात कमीत-कमी समावेश करावा. व्हाइट मीटचा वापर करावा.
* हेडफोनचा वापर कमी करा. या सवयीमुळे ऐकण्याची क्षमता कमी होते.