करिना कपूर म्हणते, ‘ईट लोकल, थिंक ग्लोबल’

आरोग्यनामा ऑनलाइन – बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूरने बॉलिवूडमध्ये प्रथम झिरो फिगरचा ट्रेंड आणला. त्यामुळे ती तिच्या फिगरसाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिच्या या फिगरचे रहस्य करिना म्हणते ईट लोकल, थिंक ग्लोबल. याचा अर्थ स्थानिक पदार्थ खा आणि जागतिक पातळीवर विचार करा. करिना कपूरही आपल्या डाएटमध्ये स्थानिक पदार्थांना प्राथमिकता देते. तिच्या हॉट आणि सेक्सी फिगरचे डाएटिशियन ऋजूता दिवेकर यांनी हे रहस्य सांगितले आहे.

उन्हाळ्यामध्ये फळे खायची असल्यास आंबा हे स्थानिक फळ उत्तम आहे. करिनालाही आंबे आवडीने खाते. उन्हाळ्यामध्ये करिनाला आपल्याकडील सीझनल फ्रूट्स आंबा, जांभूळ आणि करवंदे खाणे खूप आवडते. उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी एका लिक्विड डाएटचे सेवन आवश्यक असते. करिनालाही उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत, लिंबू सरबत आणि गवती चहा पिणे आवडते. लंचमध्येही करिनाला दही भात आणि पापड, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी आणि पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या सीझनल भाज्या आवडतात. डाएटसोबत जास्त स्ट्रीक्ट होण्याची गरज नाही. परंतु स्वतःला जास्त सूट देणेही योग्य नाही. एक चांगले डाएट तुम्हाला भूक लागल्यानंतर जे तुम्हाला खावेसे वाटते ते खाण्याची परवानगी देते.