आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कडूलिंबाची चव कडू असली तरी ते आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. कडुलिंब एक आयुर्वेदिक औषधी असून यामुळे गंभीर आजारही मुळापासून नष्ट होतात. शरीर, त्वचा आणि केसांसाठी कडूलिंब खूप फायदेशीर आहे. याच्या कडवट चवीमुळे ते सहज सेवन करता येत नसल्याने याचे पाणी प्यावे. कडुलिंबाच्या पाण्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेवूयात.
रक्तशुद्धी
कडुलिंबा एक रक्त-शोधक औषधी आहे. हे एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
मलेरिया, कावीळ
कडुलिंबाचे पाणी मलेरिया आणि कावीळीवर रामबाण उपाय आहे. लिंबातील अँटी-बॅक्टीरिअल गुण मलेरियासाठी जबाबदार असलेल्या व्हायरसला नष्ट करून लिव्हर मजबूत करतात. कावीळ झाल्यास लिंबाच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून याचे सेवन केल्यास कावीळ नष्ट होतो.
चिकन पॉक्स
कांजण्याचे डाग त्वचेवर फार खराब दिसतात आणि हे लवकर जातही नाहीत. चिकन पॉक्सचे डाग नष्ट करण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने मसाज करा.
डोळे
डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाचा रस दोन-दोन थेंब डोळ्यास टाकावा. यामुळे डोळ्याचे आजारही दूर होतील.
मधुमेह
नियमितपणे कडूलिंबाचा रस घेतल्यास ब्लड शुगरचा स्तर वाढत नाही. मधुमेह झालेल्या लोकांनीसुद्धा याचे सेवन केल्यास फायदा होईल.
पायरिया
हिरड्यांमधून रक्त आल्यास आणि पायरिया झाल्यास लिंबाचे पान पाण्यात टाकून या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्या आणि दात मजबूत होतात. लिंबाच्या फुलांचा काढा करून प्यायल्यास दातांचे आजार दूर होतात.
गर्भावस्था
लिंबाचे पाणी गर्भावस्थेमध्ये प्यायल्यास डिलेव्हरीच्या वेळेस होणारा त्रास कमी होतो. प्रसव दरम्यानच्या वेदना कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाने मसाज करणे फायेशीर ठरते. प्रसवनंतर काही दिवस महिलेला लिंबाचे पाणी दिल्यास रक्त शुद्ध होते आणि संक्रमण होत नाही.
चेहरा
लिंबाचे पाणी लावल्यास चेहरा उजळ होतो आणि मुरुमाच्या समस्या दूर होतात. काळे डाग असल्यास लिंबाच्या पाण्याने चेहरा धुवावा. हे पाणी नैसर्गिक पद्धतीने त्वचा उजळ करण्यास मदत करते.