आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जंक फूड खाण्याची सवय सध्या खुपच वाढली आहे. पिझ्झा, बर्गर, थंडपेय यांसारख्या जंक फूडचा शरिरावर विपरित परिणाम होत असतो. यामुळे अनेक आजार जडतात. यात तेल, मीठ आणि साखरेचा वापर जास्त असतो. याचे आरोग्याला कोणते धोके असतात ते जाणून घेवूयात.
हे आहेत धोके
१ याचा परिणाम लीव्हर आणि स्वादुपिंडांवर होत असतो.
२ साखरेचे प्रमाण, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
३ मुलांमध्येही लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार दिसून येतात.
४ चाळीशीपर्यंत ह्रदयविकारांनाही अनेकजण बळी पडतात.
५ शरिरात कॅलरिजचे प्रमाण वाढते.
६ ब्रेनच्या रिवॉर्ड सिस्टमवर परिणाम होतो.
७ हायपरटेन्शन, मधुमेह, ह्रदयाशी निगडीत आजार जडतात.
८ रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेसचे प्रामाण वाढते.
Visit : arogyanama.com