आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कामातील विविध कारणांमुळे येणारा तणाव म्हणजेच बर्नआऊट आजार होय. सध्याची पिढी तणावाने ग्रस्त आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. याचे प्रमुख कारण प्रोफेशन असते. प्रोफेशनमधील तणावामुळे 30 वयाच्या आधीच बर्नआउटचा धोका होऊ शकतो. पत्रकारितेमध्ये बर्नआउटचा धोका सर्वात जास्त आहे, असे अमेरिकन सायकॉलॉजिस्ट असोसिएशनने म्हटले आहे. बर्नआउट एक खूप जास्त थकव्याची स्थिती आहे. यात भावनात्मक थकवा, मानसिक थकवा, तणाव आणि वैयक्तीत बढती मिळत नसल्याने मानसिक निराशा, यांचा समावेश आहे. बर्नआउटचा संबंध गंभीर तणाव आणि निराशा यांच्याशी असू शकतो. सध्या तरी या समस्येकडे मानसिक विकार म्हणून पाहिले जात नाही.
संशोधनातील महत्वाचे मुद्दे
1 यूनिव्हर्सिटी ऑफ कान्सासने पत्रकारितेत बर्नआउटची स्थिती आणि जॉब सॅटिस्फॅक्शनबाबत दोन अभ्यास केले. पहिला अभ्यास 2009 मध्ये केला गेला आणि त्याचा फॉलोअप अभ्यास 2015 मध्ये करण्यात आला.
2 संशोधकांना न्यूजरुममध्ये पुरुष आणि महिला कर्मचार्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असमानता आढळल्या. तसेच 62 टक्के महिला आपल्या करिअरच्या भविष्याबाबत संदिग्ध असल्याचे आढळले. त्यांना करिअरबाबत शंका होती. या महिलांनी पत्रकारिता सोडण्याचेही ठरवले होते. 2015 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात ही संख्या 67 टक्के वाढली.
3 याचा अर्थ या संशोधनात सहभागी झालेल्या पत्रकारितेतील महिलांपैकी फार कमी महिला करिअर पुढे सुरु ठेवतील.
4 चांगले पद न मिळणे, दुसर्या शिफ्टमध्ये जास्त काम असणे, कंपनीकडून पूर्णपणे समर्थन न मिळणे, ही कारणे यामागे आहेत. या सर्व लक्षणांमधून हे संकेत मिळतात की, भविष्यात पत्रकारांमध्ये बर्नआउट होण्याची शक्यता अधिक आहे.
5 काही प्रोफेशन असे असतात ज्यांच्यावर बर्नआउटचा धोका अधिक असतो. त्यातीलच एक पत्रकारिता आहे
6 मायो क्लिनीक आणि सायकॉलॉजी टुडेसारख्या प्रतिष्ठित मेडिकल सेंटरवर बर्नआउटसारख्या स्थितीची योग्य वेळ जाणून घेणे आणि यापासून वाचण्यासाठी काही उपाय देण्यात आले आहेत.