Joint Pain हृदय आणि फुफ्फुसासाठी धोकादायक, ‘या’ संकेताकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Joint Pain | joint pain arthritis is dangerous for heart and lungs dont ignore these signs ankylosing spondylitis

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पाठ आखडणे, पाठीत आणि सांध्यात वेदना होत असल्याने रात्री नीट झोप येत नाही का? सांधेदुखीमुळे (Joint Pain) रात्री तीन ते चार वाजता उठत असाल आणि अस्वस्थ वाटत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण, तुम्हाला स्पॉन्डिलायटिसची समस्या (Ankylosing spondylitis Problem) असू शकते. स्पॉन्डिलायटिसमुळे हृदय (Heart), फुफ्फुस (Lungs) आणि आतड्यांसह (Intestines) शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ (Joint Pain) शकतो.

 

धोकादायक आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस (Serious Complication Of Ankylosing Spondylitis)
तज्ज्ञांच्या मते, स्पॉन्डिलायटीस (Spondylitis) कडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा धोका संभवतो. यामुळे मोठ्या आतड्याला सूज येऊ शकते, म्हणजे कोलायटिस (Colitis) आणि डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.

 

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष (Symptoms Of Ankylosing Spondylitis)
स्पॉन्डिलायटिस हा एक प्रकारचा संधिवात (Arthritis) आहे. यामध्ये कंबरेपासून दुखणे सुरू होते आणि पाठ व मानेमध्ये जडपणा येण्याबरोबरच शरीराच्या खालच्या भागात, मांड्या (Thighs), गुडघे (Knees), घोट्यात वेदना (Ankle Pain) होतात. मणका आखडलेला राहतो. स्पॉन्डिलायटिसमध्ये सांध्यांना सूज आल्याने असह्य वेदना होतात.

 

तरुणांना स्पॉन्डिलायटिसचा धोका (Risk of Spondylitis In Young Age)
सध्या तरुणांमध्ये स्पॉन्डिलायटिसच्या तक्रारी अधिक प्रमाणात वाढत आहेत. 45 वर्षांखालील पुरुष आणि स्त्रियांमध्ये स्पॉन्डिलायटिसची समस्या दिसून येते.

 

अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (Ankylosing Spondylitis) हा एक सामान्य प्रकारचा संधिवात आहे ज्यामध्ये पाठीचा कणा प्रभावित होता. यामध्ये खांदे (Shoulders), कूल्हे (Hips), बरगड्या (Ribs), घोट्यात आणि हात-पायांच्या सांध्यात वेदना होतात. त्याचा परिणाम डोळे (Eyes), फुफ्फुस (Lungs) आणि हृदयावरही (Heart) होतो.

मुलांना देखील होतो संधिवात (Childhood Arthritis)
जुवेनाईल स्पॉन्डिलोआर्थराइटिस (Juvenile Spondyloarthritis) मुलांमध्ये होतो, जो 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो आणि तो प्रौढ होईपर्यंत राहतो. यामध्ये शरीराच्या खालच्या भागाच्या सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येण्याची तक्रार असते.

 

मांड्या, कूल्हे, गुडघे आणि घोट्यात वेदना होतात. त्यामुळे पाठीचा कणा, डोळे, त्वचा आणि आतडे यांनाही धोका निर्माण होतो. थकवा आणि सुस्ती जाणवते. स्पॉन्डिलायटिसने ग्रस्त असलेल्या लोकांना रात्री झोप येत नाही आणि सांधेदुखीमुळे (Joint Pain) ते पहाटे तीन ते चार वाजता उठतात आणि अस्वस्थ होतात.

 

जेनेटिक म्युटेशन हे मोठे कारण (Genetic Mutations Cause)
स्पॉन्डिलायटिस हा मुख्यतः जेनेटिक म्युटेशनमुळे (Genetic Mutations) होतो. एचएलए-बी जीन (HLA-B gene) शरीराच्या इम्युनिटी सिस्टमला (Immune System) व्हायरस आणि बॅक्टेरियाचा हल्ला ओळखण्यास मदत करतो.

 

परंतु जेव्हा जीन एका खास म्युटेशनमध्ये असतो तेव्हा त्याचे निरोगी प्रोटीन संभाव्य धोके ओळखू शकत नाहीत
आणि ही इम्युनिटी शरीरातील हाडे (Bones) आणि सांधे यांना लक्ष्य करते, जे स्पॉन्डिलायटिसचे कारण आहे.
मात्र, यामागची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.

 

तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या (Expert Doctor Consultation)
सांधेदुखीची तक्रार असेल तर त्याची तपासणी करा. कारण वयानुसार ती वाढते. एचएलए-बी27 चाचणी करून स्पॉन्डिलायटिसचे निदान केले जाते.

 

एचएलए-बी27 (HLA-B27) हा एक प्रकारचा जीन आहे जो रक्ताच्या तपासणीद्वारे शोधला जातो.
यामध्ये रक्ताचा नमुना घेऊन त्याची लॅबमध्ये चाचणी केली जाते. याशिवाय एमआरआयमध्ये स्पॉन्डिलायटिस देखील दिसून येते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Joint Pain | joint pain arthritis is dangerous for heart and lungs dont ignore these signs ankylosing spondylitis

 

हे देखील वाचा

 

Diabetes च्या रूग्णांनी हळदीसोबत मिसळून घ्याव्यात ‘या’ 2 गोष्टी, कंट्रोलमध्ये राहील ब्लड शुगर लेव्हल

Kidney Stone | किडनी स्टोनपासून राहायचे असेल मुक्त, तर चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 वस्तू गोष्टी; जाणून घ्या

Slim Waist Exercises | कमरेवर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी खुप प्रभावी आहेत ‘या’ 3 एक्सरसाईज