आरोग्यनामा ऑनलाईन टीम : विमान प्रवास हा आरामदायक असला तरी जेट लॅगमुळे हा प्रवास कधकधी त्रासदायक ठरतो. थकवा, चक्कर येणे, झोप, अपचन, ब्लड प्रेशरमध्ये चढ-उतार, असे त्रास होतात. हा त्रास टाळायचा असल्यास काही खबरदारीचे उपाय करावेत. यासाठी काही खास टीप्स आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
प्रवास केल्यानंतर चादरीमध्ये गुरफटून जाण्याऐवजी खोलीच्या खिडक्या पूर्ण उघडा. प्रकाश-मोकळी हवा आत येऊ द्या. यामुळे तुम्ही ताजेतवाने होता.
व्यायामाचे रूटिन चुकवू नका. व्यायामामुळे शरीराची परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता वाढते.
प्रवास करून आल्यानंतर बाहेर पायी थोडा फेरफटका मारा. शक्यतो विमानात झोप घेणे टाळा.
Visit : arogyanama.com