आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जवस हे एक तेलबिया पीक असून पोषणमूल्ययुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार आहेत. परंतु जवस हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. याने आरोग्याच्या अनेक समस्या नियंत्रणात येतात. त्यामुळे जवस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जवसाचे औषधी उपयोग काय आहेत ते जाणून घ्या.
जवसाचे फायदे खालीलप्रमाणे :
१) लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याचे ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. १२ ग्रॅम जवस आणि ६ ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर १ लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात १२ ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज २ चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. यामुळे लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.
२) रोजच्या आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.
३) दररोज सकाळी काहीही न खाता एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.
४) पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.
५) सर्दीमुळे कफ झाला असेल तर जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.