आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Jaundice Cure | लिव्हर (Liver) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो, आपण जे काही खातो आणि पितो त्यावर प्रक्रिया करतो. हे शरीराला अन्नातून पोषकतत्वे घेण्यास आणि त्यांचे उर्जेमध्ये रूपांतरित करण्यास मदत करते. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि जुन्या आणि खराब झालेल्या रक्त पेशी देखील काढून टाकते. जेव्हा या प्रक्रियेत अडथळा येतो, तेव्हा या टाकाऊ पदार्थांमुळे बिलीरुबिन (Bilirubin) तयार होऊ लागते, ज्यामुळे कावीळ होऊ शकते. (Jaundice Cure)
बिलीरुबिन हा एक तपकिरी-पिवळा द्रव आहे जो लाल रक्तपेशी तुटल्यावर तयार होतो. हा पदार्थ लिव्हरमध्ये आढळतो आणि सामान्यतः पचनादरम्यान शरीराबाहेर जातो. बिलीरुबिन जेव्हा रक्तामध्ये जमा होऊ लागते तेव्हा ते धोकादायक असते. रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण जास्त असल्यास कावीळ होते. काविळीमुळे त्वचेचा रंग पिवळा होऊ लागतो. कावीळ हा हिपॅटायटीस ए किंवा हिपॅटायटीस सी विषाणूमुळे (Hepatitis C) होणारा आजार आहे. काविळीची समस्या अनेकदा लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते. (Jaundice Cure)
कावीळची लक्षणे (Symptoms of Jaundice) :
1. शरीरात रक्ताची कमतरता होते.
2. शरीर पिवळे पडू लागते.
3. पचनसंस्था कमकुवत होते.
4. डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसतो.
5. नखे पिवळी दिसतात.
6. मूत्र पिवळसर होते.
शरीरात काविळीची लक्षणे असतील तर त्यावर त्वरित हे उपचार करा…
1. जास्त पाणी प्या (Drink more water) :
दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्या. जास्त पाणी पिण्याने लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि वजन नियंत्रित राहते. जास्त पाणी प्यायल्याने रक्त पातळ होते, ज्यामुळे लिव्हरला ते फिल्टर करणे सोपे होते.
2. कॉफी आणि ग्रीन टीचे सेवन करा (Consume Coffee and Green Tea) :
2017 मधील संशोधन असे आढळून आले की, दररोज सुमारे तीन कप कॉफी किंवा ग्रीन टी पिण्याचे लिव्हरवर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हर्बल टीचाही शरीरावर असाच परिणाम होत असल्याचे याच संशोधनातून दिसून आले आहे. कॉफी आणि ग्रीन टी लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहेत. हे अँटिऑक्सिडंट्सची पातळी वाढवते, जे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
3. धने सेवन करा (Consume Coriander) :
रात्री एक ग्लास पाण्यात धने भिजवून सकाळी या पाण्याचे सेवन करा, कावीळ लवकर दूर होईल.
4. मुळ्याचे सेवन करा (Consume Radish) :
कावीळ झालेल्या रुग्णांनी मुळ्याचे सेवन करावे. कावीळच्या उपचारातही मुळ्याची पाने गुणकारी आहेत. मुळा पचन सुधारतो आणि कावीळ लवकर दूर करतो.
5. उसाचा रस प्या (Consume Sugarcane Juice) :
काविळीच्या रुग्णांनी उसाच्या रसाचे सेवन करावे, लवकर बरे व्हाल. लिंबू, संत्री, करवंद आणि टोमॅटोचे सेवन केल्यानेही हा आजार लवकर बरा होतो.
6. त्रिफळा पावडर सेवन करा (Consume Triphala Powder) :
एक चमचा त्रिफळा चूर्ण एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी गाळून सेवन करा, कावीळ दोन आठवड्यात बरी होईल.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Jaundice Cure | know the effective home remedies to cure jaundice problem
हे देखील वाचा
Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या
Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा