आरोग्यानामा ऑनलाइन टीम : आपल्याकडे दात कसे स्वच्छ करायचे हे कुणीही शिकवत नाही. ब्रश घेऊन मोठ्यांचे पाहून मुले स्वता ब्रश करू लागतात. मुळात मोठेसुद्धा योग्यपद्धतीने ब्रश करतात अथवा नाही, इथपासूनच शंका असते. जपानमध्ये लाइफ स्किल्स शिकवत असलेल्या शाळांमध्ये मुलांना दात घासणे शिकवण्यासाठी हामागाकी हा एक खास समारंभ घेतला जातो. येथे मुलांना दात उत्तम घासता येणे, त्याची आवड निर्माण होणे महत्वाचे मानले जाते. शालेय शिक्षणातील ही महत्वाची गोष्ट मानली जाते. दुर्दैवाने आपल्याकडे यास फार महत्व दिले जात नाही.
गुळणी करा
प्रत्येक जेवणानंतर गुळणी केली पाहिजे. तसेच रात्री झोपताना कोमट पाण्याने गुळणी करा.
भरपूर पाणी प्या
पाणी कमी प्यायल्याने तोंड आतून कोरडे होऊन बॅक्टेरियांची वाढ जोरात होते. यामुळे तोंडाला दुर्गंधी येणे, दाताला कीड लागणे, असा त्रास होतो. यामुळे पाणी भरपूर प्या.
नियमित तपासणी
दात किडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडे जावून दात तपासा. स्वच्छ करुन घ्या.
ब्रश करताना घाई नको
ब्रश करताना घाई करू नका. पुरेसा वेळ द्या. सावकाश, हलक्या हाताने आणि हिरड्यांना मसाज करत दात घासा.
योग्य ब्रश निवडा
तुमच्या दातांप्रमाणे ब्रशचा वापर करा. यासाठी डॉक्टरांचा सल्ल घ्या. चुकीचा ब्रश वापरला तर त्याचा दातांवर वाईट परिणाम होतो.
Visit : arogyanama.com