आरोग्यनामा ऑनलाईन टीम – विशिष्ट रंग आणि चवीमुळे जांभूळ अनेकांना आवडते. जांभळाची झाडे जंगलभागात मोठ्याप्रमाणात असतात. मधुमेहावर जांभूळ खूप लाभदायक आहे, एवढाच जांभळाचा औषधी उपयोग आपल्याला माहित आहे. मात्र, जांभळाची फळे, पाने आणि बियांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जांभळाचे नियमित सेवन केल्यास शरीराचे तीन महत्वाचे भाग निरोगी राहतात. पोट, दात आणि हृदय हे ते तीन भाग होय. म्हणूनच जांभूळ नियमित सेवन करणे खूप फायदेशिर ठरते. जांभळात कोणती पोषक तत्त्वे आहेत, तसेच जांभळाचे सेवन कसे करू नये, याबाबत आपण माहिती करून घेणार आहोत.
पानांपासून दंतमंजन
हिरड्या आणि दातांसाठी जांभूळ खूप फायदेशीर असून जांभळाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतो. दात, दाडदुखीत जांभळाची पाने वापरल्यास हिरड्यातून रक्त येण्याची समस्या दूर होते. जांभळाची पाने वाळवून याची पावडर तयार करून दात घासण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यामुळे दातांच्या इंफेक्शनपासून बचाव होतो.
बियांचा असा करा वापर
जांभूळ पोटाच्या अनेक समस्यांवर लाभदायी आहे. याच्या उपायाने पोटाच्या आजारात आराम मिळतो. सैंधव मीठासोबत खाल्ल्यास भूक वाढते. हे यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रोज जांभूळ खावे. याच्या बियांना वाळवून ठेवा. याचा वापर कधीही करता येतो.
हायपर टेन्शनपासून बचाव
जांभळात असणाऱ्या पोटॅशियमच्या अधिक मात्रेमुळे हायपरटेंशनपासून बचाव होतो. जांभळात अंथोसायनिडिंस, अलेजियेक अॅसिड आणि अंथोसायनिंस असते. यात अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात जे हृदयाच्या आजारांपासून बचाव करतात. जांभळामध्ये अँटीऑक्सीडेंटसची मात्रा पुरेशी असते. जे कोलेस्टेरॉलला नियंत्रित करते.
जांभूळ असे खावू नका
१) एकावेळी २०० ग्रॅमपेक्षा जास्त जांभूळ खाऊ नये.
२) जांभूळ खाल्ल्यानंतर १ तास दूध पिऊ नये.
३) कधीही उपाशीपोटी जांभूळ खाऊ नका.