आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दुध हे शरीरासाठी खुप पोषक असल्याने त्यास पुर्णान्न म्हटले जाते. परंतु, या दुधात काही खास पदार्थ टाकून ते घेतल्यास त्याचे फायदे आणखी वाढू शकतात. रात्री ग्लासभर दुध घेण्याची सवय अनेकांना असते. अशा लोकांनी त्यामध्ये जर गुळ टाकून सेवन केले तर त्यांना विविध प्रकारचे आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.
हे आहेत फायदे
1) रक्तशुद्धीकरण
गुळामुळे रक्त शुद्ध होते. हिमोग्लोबीनचे प्रमाण आणि रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
2) वजन कमी होते
रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत गुळाचे सेवन केल्यास वजन कमी होते.
3) पचन प्रक्रिया सुधारते
गुळामुळे पचन प्रक्रिया सुलभरित्या होते व पोटामध्ये गॅस निर्माण होत नाहीत.
4) दम्यावर लाभदायक
थंडीत दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. त्यांच्या शरीरात उष्णता कायम राहावी व कफ बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर आहे.
5) सांधेदुखी कमी होते
दुधातील व्हिटॅमिन डी व कॅल्शिअम आणि गुळातील लोहामुळे सांधे मजबूत होतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)