आरोग्यनामा ऑनलाईन टीम- मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराबाबत काळजी घेणे खूप गरजेचे असते. जराही चुकून काही गोड खाल्ले गेले तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. शरीरातील साखरेचे वाढलेले प्रमाण अनेक रोगांना आमंत्रित करू शकते व हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक असते. मात्र असे एक गोड फळ आहे जे खाल्ल्यास तुम्हाला मधुमेहाचा फारसा त्रास होत नाही. ते फळ म्हणजे फणस होय. या फळात कमी ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ असल्याने ब्लड ग्लुकोजचे प्रमाण वाढविणारे कर्बोदके किंवा घटक कमी असतात तसेच शुगर लेव्हल अचानक वाढत नाही. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी फणस हे फळ सुरक्षित असते.
फणसामध्ये फायबरचे गुण असतात. यामुळे पचनक्रिया हळू होते. त्यामुळे साखरेचे प्रमाणही वाढत नाही. त्याचप्रकारे फणसात प्रोटिन्स जास्त प्रमाणात आढळते याने रक्तातील शुगरची पातळी वाढत नाही. फणसाइतकीच त्याची पानेसुद्धा उपयुक्त असतात. तुम्ही कच्चे फणसही खाऊ शकतात. मात्र कच्चे फणस खाताना काळजी घ्यावी. कारण त्यामुळे तुम्हाला अॅलर्जीही होऊ शकते. फणसाचे अजूनही भरपूर फायदे आहेत. म्हणून आठवड्यातून एकदातरी हे फळ खाल्ले पाहिजे.
फणस खाण्याचे फायदे –
– फणसात व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. तसेच त्वचाही टवटवीत राहते. जर तुम्हाला पिकलेला फणस खूपच जास्त आवडत असेल तर तुम्ही फणसाची गरे काढून पाण्यात उकळून त्याचा रसही पिऊ शकतात.
– फणसामध्ये पोटॅशिअम असल्याने तसेच कॅलरीज नसल्याने उच्च रक्तदाबासारखे हृदयाशी निगडित कोणतेही आजार होत नाहीत.
– फणसाच्या गरात असणारे पांढरे दूध कापलेल्या भागावर लावल्यास ते लवकर बरे होते. तसेच हाडांचे दुखणेही कमी होते.
– फणसाच्या सेवनाने अल्सर आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. फणसाच्या पानांपासून चूर्ण बनवून रोज खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.