आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीत कामाचे स्वरूप बदलले आहे. कामाचे ओझे, स्पर्धा, यामुळे मानसिक ताण सतत वाढत चालला आहे. हा तणाव दूर करण्यासाठी आयंगर योगा खूप लाभदायक ठरतो. यामुळे तन आणि मन दोन्ही निरोगी राहते. योग प्रशिक्षक बीकेएस आयंगर यांनी काही योगासनांमध्ये नवीन तंत्रांचा समावेश करून आयंगर योगाची रचना केली आहे. हा योगा करून तणावमुक्त आणि स्फूर्तीयुक्त जीवन जगता येऊ शकते.
दोनशे पारंपरिक योगासने आणि चौदा विविध प्रकारचे प्राणायाम एकमेकांशी जोडत बीकेएस आयंगार यांनी आधुनिक रंग देऊन आयंगर योगा ही नवी योग पद्धती तयार केली आहे. या पद्धतीमध्ये बेल्ट, ब्लॉक किंवा ब्लँकेट यासारख्या वस्तूंचा वापरही योग्य आसन करण्यासाठी सतत करावा लागतो.
आयंगर योगा आरोग्यासाठी फायदेशीर आहेच, पण याच्या माध्यमातून अनेक आजारांवर उपचारही केले जाऊ शकतात. क्रॉनिक बॅक पेन म्हणजेच पाठीचा त्रास, इम्युनोडिडेफिशियन्सी म्हणजेच शरीराच्या एखाद्या भागात प्रतिरोधक तंत्राचे काम न करणे, उच्च् रक्तदाब, निद्रानाश, उदासी, मोनोपॉज, याशिवाय इतर अनेक शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. आयंगर योगा पद्धत इतर पद्धतींपेक्षा तंत्र, क्रमवारी आणि टायमिंगमुळे वेगळी ठरते. यामध्ये शरीराच्या संरचनेच्या सूक्ष्मतेवर आणि प्राणायाम करण्याच्या पद्धतींवरही विशेष लक्ष दिले जाते.
यामध्ये योग आणि श्वसनक्रियेच्या व्यायामाच्या क्रमावर लक्ष देणे होय. याद्वारे मनासारखे निष्कर्ष मिळवण्यासाठी क्रम पाळणे खूप आवश्यक आहे. आसन योग्य पद्धतीने आणि क्रमानेच करणे गरजेचे नाही, तर योग्य टायमिंगदेखील आवश्यक आहे. म्हणजे कोणते आसन किती वेळेपर्यंत करायचे आहे, हेदेखील निश्चित केले पाहिजे. आयंगर योगामध्ये उभ्या मुद्रांवर जास्त लक्ष दिले जाते, जेणेकरून पायांना बळकटी मिळेल आणि शरीराचा रक्तप्रवाह, समन्वय तथा संतुलन चांगले ठेवता येईल.