आरोग्यनाम ऑनलाईन- अन्न हे पूर्ण ब्रम्ह असे म्हटले जाते. पण एकदा भरपेट जेवण झाल्यावर काहीतरी गोड खात आसाल तर त्याचा तुमच्या तब्बेतीवर गंभीर परिणाम होण्याशी शक्यता आहे. भारतीय खाद्य संस्कृतीत जेवण नंतर काही काह्ण्याच्या वेगळ्या सवयी आहेत आणि पाछयात्य देशातील वेगळ्या सवयी आहेत ज्या तेथील भूगोलिक परिस्थितीवर आधारित आहेत. पण आज काळ सगळ्याच सवयी पाछ्यात्या संस्कृतीचे अनुसरण करत आहेत म्हणून खाण्याच्याही सवयी त्याच प्रकारे पाळल्या जात आहेत. तय्त्लीच एक सवय म्हणजे जेवण झाल्यावर काही ही गोड पदार्थ खाणे स्वीट डिश म्हणा किंवा मग डाईट. गोड म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच.
आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे स्वीट डिश हा पाश्चिमात्य संस्कृतीतला प्रकार आरोग्यासाठी चांगला नाही. डॉक्टरांचा सल्ला आहे की, गोड पदार्थ खायचे असतील तर ते जेवणाआधी अर्धातास खावेत.
आयुर्वेद डॉक्टरांच्या मते गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरूवातीलाच त्यांचं सेवन केल्याने त्यांचं पचन उत्तम होतेच, शिवाय पुढे जेवणाचं प्रमाणही प्रमाणही मर्यादीत राहतं. याउलट जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी गोड पदार्थ खायचे असल्यास ते जेवणाच्या सुरूवातीला किंवा किमान जेवताना मध्ये खावेत.
प्रत्येक व्यक्तीसाठी सकस आहार महत्त्वाचा असतो. काय खावं, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावं, जेवताना कसं बसावं इतकंच नाहीतर आहार कधी घ्यावा कधी कमी खावं याची सुद्धा आयुर्वेदात माहिती देण्यात आली आहे. कारण आहार घेताना तो व्यवस्थितरित्या पचला पाहिजे.
अग्नी ही आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे. आपल्या अन्नाचं पचन करण्याचं काम शरीरातील अग्नी करतो. कारण सूर्य व शरीरातील अग्नीचा यांचा थेट संबंध असतो. त्यामुळे शरीरातील अग्नी सायंकाळी सुर्योद्यानंतर मंद होतो म्हणून हलका आहार करावा. खूप उशिरा जेवू नये त्यामुळे अन्न पचण्यास अवघड होतं. अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यास पोटाचे विकार सुरू होतात.
इतकंच नाहीतर लग्नामध्ये, पाटर्यांमुळे, संमेलनांमध्ये जेवल्याच्या नंतर स्वीडडिश खायला दिले जाते. यात गुलाबजाम, जिलेबी किंवा रबडी यांसारखे पदार्थ ठेवले जातात. गोड पदार्थ पचण्यास जड असल्याने पोटासंबंधित विकार होऊ शकतात. पण अनेकांना याबाबत माहितीचं नसतं. त्यामुळे जेवणापूर्वी गोड पदार्थ खावेत किंवा जेवत करताना मध्येच गोड पदार्थांचे सेवन करावेत. जेणेकरून अन्न चांगल्या प्रकारे पचन होते.