आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मासिक पाळी एखाद्या वेळेस २-३ दिवस मागे पुढे होणे ठीक आहे. पण प्रत्येक वेळेस जर २८ दिवसाच्या अगोदर मासिक पाळी येत असेल तर ते महिलांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. वेळेच्या आधी मासिक पाळी येणे हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे वेळेच्या आधी येणाऱ्या मासिक पाळीकडे दुर्लक्ष करू नका.
१) चहा / कॉफी :
महिलांनी चहा कॉफीचे जास्त सेवन केले तर याचा त्यांच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. आणि महिलांचे हार्मोन्स वाढतात. त्यामुळे त्यांना मासिक पाळी वेळेच्या आधी येते. त्यामुळे महिलांनी चहा, कॉफी पिण्याचे शक्यतॊ टाळावे.
२) ताणतणाव :
सध्या अनेक महिला नोकरी करतात. त्यांच्यावर कामाचा खूप ताण असतो. त्यामुळे ताणतणाव जास्त झाला तर शरीरातील हार्मोन्सच्या उत्पत्तीवर परिणाम होतो. आणि महिलांना मासिक पाळी वेळेच्या आधी येते.
३) चांगला आहार न घेणे :
अनेक महिला शरीराला पाहिजे असलेला आहार घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शरीरात पोषक तत्वाची कमी असते. यामुळे महिलांच्या शरीरातील चरबी वाढायला सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर मासिक पाळी लवकर येते.
४) वर्क आउट :
काही महिलांना खूप काम करावे लागते. तर काहीजणी जिममध्ये जाऊन वर्क आऊट करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात शक्ती राहत नाही. परिणामी त्यांचे वजन कमी होण्यास किंवा वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे मासिक पाळी लवकर येते.