आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्राणायामामुळे शरीरात ऑक्सिटॉसिन हार्मोन्सचा स्तर वाढतो. यास लव्ह हार्मोन असेही म्हटले जाते. कारण या हार्मोनमुळे आपसातील संबंध मजबूत होतात आणि विश्वास वाढतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे. या शोधानुसार प्रणयाचा आरोग्याला मोठा फायदा आहे. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. तसेच तणाव कमी होतो. अशा प्रकारे प्रणय आणि आरोग्याचा निकटचा संबंध आहे.
हृदयविकार असेल तरी करा प्रणय
हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी २४ महिला आणि २२ पुरुषांवर अभ्यास केला. जे लोक नियमित प्रणय करतात ते तणावाला सहजरीत्या दूर करू शकतात. प्रणय करत राहिल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे या संशोधनात आढळून आले आहे. प्रणय केल्याने जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असा एक समज आहे. मात्र, इंग्लंडमधील एका संशोधनानुसार यात तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.
महिला डिप्रेशनपासून दूर राहतात
प्रणयामुळे महिलांना भावनिक फायदा होतो आणि त्या डिप्रेशनसारख्या आजारापासून दूर राहतात. महिलांना परमोच्च आनंदाची जाणीव पुरुषांच्या तुलनेत जास्त वेळ राहते कारण सर्विक्स स्पर्म ओव्हरीपर्यंत जाण्याच्या प्रक्रीमध्ये वेळ लागतो. या दरम्यान महिला परमोच्च आनंदाचा अनुभव घेतात.
मसल्स, हाडे मजबूत होतात
जेवढा जास्त प्रणय करता तेवढाच जास्त फायदा आरोग्याला होतो. प्रणय केल्याने मसल्स मजबूत होतात आणि हाडांची मजबुती वाढते. ज्या महिला कमी सेक्स करतात, त्यांना रजोनिवृत्तीनंतर ऑस्टियोपोरोसिसची समस्या होऊ शकते.
लठ्ठपणा कमी होतो
अर्ध्या तासाच्या प्रणयामुळे ८५ कॅलरी बर्न होतात. ८५ कॅलरी हे प्रमाण फार जात नाही. परंतु विचार करा अध्र्या तासाच्या ४२ सेशननंतर ३५७० कॅलरीज बर्न होतील. एवढ्या कॅलरीज बर्न झाल्यानंतर एक पाउंड वजन कमी होईल. प्रणयामुळे लठ्ठपणा कमी होतो.
कॅन्सरचा धोका कमी होतो
सेक्समुळे पुरुषांमधील प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. जे वयाने ३० वर्षांपेक्षा कमी आहेत, सेक्समुळे त्यांना भविष्यात प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी राहतो. सेक्समुळे शांत झोप लागते. सेक्सनंतर रिलीज झालेल्या ऑक्सिटॉसिनचा एक फायदा हासुद्धा आहे.