तात्काळ वजन कमी करायचंय, ‘या’ पध्दतीचा अवलंब करा !
इंटर्व्हल ट्रेनिंग असे करा
* अॅरोबिक्स, डान्स आणि स्टेप वर्कआउट यांसारखे ग्रुप एक्झरसाइजमध्ये इंटर्व्हल प्रिन्सिपल फॉलो करा.
* आठवड्यात दोन दिवस किक-बॉक्सिंग, स्विमिंग, स्पिनिंग, कार्डिओ करू शकता.
* वेट ट्रेनिंगमुळे मसल्स मजबूत होतील.
* मध्यंतरात खाल्ले तर चांगले परिणाम मिळतील. दिवसभरात तीन वेळा खाण्याऐवजी पाच ते सहा वेळा थोडे-थोडे जेवण घ्यावे. नट्स आणि सीड्स खाल्ले तर व्हिटॅमिन्स आणि मिनलरची कमतरता भासणार नाही.
* ट्रेड मिलवर वॉकिंग आणि जॉगिंग दोन्ही करावे. ग्रेड-५ वर चाला. सपाट पृष्ठभागावर जॉगिंग करू शकता. इनक्लाइन पोझिशनवर चालताना वेग कमी ठेवा. बागेत जाऊन इंटर्व्हल रनिंग प्रॅक्टिस करू शकता.
* क्रॉस ट्रेनिंगचे चांगले परिणाम दिसतात. प्रत्येक मशीनमध्ये वेगळी पॉश्चर गाइडलाइन असते. जास्तीत जास्त कॅलरी जाळण्यासाठी ते फॉलो करा. कणा ताठ ठेवा आणि जास्त कॅलरीज जाळण्यासाठी बाजू मागे-पुढे करा.
* सुरुवातीला लेव्हल-१ दोन मिनिटांपर्यंत करा. प्रत्येक दोन मिनिटांनंतर लेव्हल वाढवा आणि लेव्हल-५ पर्यंत जा. सरासरी आरपीएम ६० ते ६५ दरम्यान असावी. दहा मिनिटांपर्यंत असे केल्यानंतर लेव्हल-१ पर्यंत परत या. असे २ ते ३ मिनिटे करा.
Comments are closed.