आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गेल्या पाच दशकांमध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सर्वजण इंटरनेटच्या बऱ्यापैकी आहारी गेले आहेत. मात्र जसेजसे तंत्रज्ञान वाढत आहे तसा त्याचे दुष्परिणाम देखील समोर येऊ लागले आहेत. इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने मेंदूमध्ये बदल होऊन लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मृती आणि सामाजिक संवाद यावर परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष एका अहवालातून पुढे आला आहे. इंटरनेटच्या अति वापरामुळे जाणिवेच्या विशिष्ट क्षेत्रांत तात्पुरते आणि दीर्घकाळासाठीचे बदल होऊ शकतात. ते मेंदूमध्ये बदलाच्या स्वरूपात दिसू शकतात. त्यामुळे मेंदूच्या क्षमतांवर परिणाम होतो.
इंटरनेटचा मेंदूवर होणार परिणाम –
१) इंटरनेटच्या अतिरेकी वापरामुळे मेंदूच्या अनेक कार्यावर परिणाम होऊ शकतो.
२) इंटरनेटकडून सातत्याने मिळणारे संदेश, सूचनांमुळे व्यक्तीचे लक्ष एकाच वेळी वेगवेगळ्या बाबींकडे वेधले जाते. त्यामुळे कोणत्या तरी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची मेंदूची क्षमता कमी होऊ शकते.
३) आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या माहिती, ज्ञान तसेच विचारांवरही इंटरनेटचा प्रभाव पडतो. परिणामी मेंदूमध्ये जी मूल्ये, माहिती, ज्ञान संग्रहित करून ठेवतो, त्यापद्धतीमध्येच बदल घडतो.
४) व्यसनाधीनतेमुळे एखाद्याची स्थिती जशी होते तशीच ती इंटरेनेटच्या आहारी गेलेल्यांची होते त्यानुसार त्याला इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डर, असे नाव दिले गेले आहे.
५) इंटरनेटच्या अतिरेकी वापरमुळे चिडचिडेपणा, राग, अस्वस्थता, एकटेपणा आणि विचारांवर नियंत्रण न राहणे असा समस्यांनी तरुणाईला ग्रासले आहे.