पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आज २१ जून जागतिक योगदिन भारतात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. यात लहान मुलांपासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत सर्वच जण आज योगदिन साजरा करत आहेत. आणि भारतात तर फार पूर्वीपासून योगाला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे अनेक लोक इतर देशातून योगा करण्यासाठी आपल्या देशात येत असतात. आपण आतापर्यंत फक्त रामदेव बाबांचा योगा पाहत आलो आहोत. परंतु रामदेव बाबांसारखा योगा करणारे अजूनही काही योगगुरू आपल्या भारतात आहेत. आज जागतिक योगदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊ भारतातील या प्रसिद्ध योगगुरूंबद्दल.
योगामध्ये महत्वाचे योगदान देणारे हे भारतातील योगगुरू
१) धीरेंद्र ब्रम्हचारी : धीरेंद्र ब्रम्हचारी हे इंदिरा गांधींचे योगशिक्षक होते. त्यांनी दूरदर्शन या वृत्तवाहिणीवर त्यांनी प्रथम योगाला सुरुवात केली. तसेच दिल्लीच्या विश्वयातन या आश्रमात आणि शाळांमध्ये ही त्यांनी योग करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून अनेक शाळांमध्ये योगा करून घेतला जातो. या योगगुरूंनी योगाची पुस्तके लिहून लोकांपर्यंत योगाची माहिती पसरवली. आता ते जम्मू ला त्यांच्या आश्रमात योगाचे धडे देत आहेत.
२) बी. के. एस.अयंगर: योगाचा जगभर प्रसार करण्यात अयंगर यांचा खूप मोठा वाटा आहे. २००४ साली टाइम मैगजीन ने त्यांचा नाव जगतातील १०० प्रभावशाली लोकांमध्ये त्यांचा नाव सामील केलं होत. त्यांची अयंगर योग नावाने एक शाळाही हि आहे. या शाळेच्या माध्यमातून ते योगाची जनजागृती करत असतात. तसेच “लाईट ऑन योग ” या नावाने त्यांचं पुस्तकही आहे. त्याला लोक योग बायबल या नावाने ओळखतात.
३) महर्षी महेश योगी- महर्षी महेश योगी हे जगात ” ट्रांसैडेंटल मेडिटेशन ” चे प्रसिद्ध योगगुरु होते. अनेक मोठं मोठे लोक त्यांना गुरु मानत होते. त्यांच्या योगामुळे ते खूप प्रसिद्ध गुरु झाले होते. श्री श्री रविशंकर हे पण महर्षी योगींचे शिष्य होते.
४) तिरुमलाई कृष्णमचार्य : यांना आधुनिक योगाचे पिता असे म्हंटले जाते. हठयोगाला जिवंत करण्याचे पूर्ण श्रेय तिरुमलाई कृष्णमचार्य यांना जाते. तसेच यांना आयुर्वेदाची खूप माहिती होती. अनेक लोक आजार बरा करण्यासाठी त्यांच्याकडे येत होते. आणि आपला आजार बरा करून जात होते. त्यांनी पूर्ण भारतात योगाची करून दिली हाती.
५) कृष्ण पट्टाभी जोइस : हे पण एक खूप मोठे योगगुरू होते. त्यांचा जन्म २६ जुलै १९१५ ला झाला होता. आणि मृत्यू २००९ ला झाला. यांनी कृष्ण यांनी विन्यास योग्य शैली विकसित केली होती.
६) परमहंस योगानंद- परमहंस योगानंद त्यांच्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ यामुळे ओळखले जातात. त्यांनी लोकांना मेडिटेशन आणि क्रिया योगाने प्रसिद्ध आहेत. परमहंस योगानंद हे योगाचे पहिले आणि मुख्य गुरु आहेत. त्यांनी खूप दिवस अमेरिकेत राहिलेले आहेत.
७) स्वामी शिवानंद सरस्वती- स्वामी शिवानंद सरस्वती हे डॉक्टर होते. त्यांनी अनेक विषयावर २०० पुस्तक लिहले आहेत. ‘शिवानंद योग वेदांत’ या नावाने त्यांच एक योग सेंटर हि आहे. त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन या योग सेंटर ला अर्पित केलं आहे.