पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – मासिक पाळी हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु, यामुळे होणाऱ्या त्रासाला महिलांना दर महिन्याला सामोरे जावे लागते. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना या कधी कधी खूप असह्य होतात. पोटात होणाऱ्या वेदनांसाठी काही महिला Meftal Spas नावाची गोळी घेतात. मात्र या गोळीने थोडा वेळ आराम मिळतो. आणि पुन्हा वेदना व्हायला लागतात. त्यामुळे या वेदनांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करायचा असेल तर खालील आसने नियमित करा. मासिक पाळीत होणारा त्रास नियंत्रणात येईल.
मासिक पाळीत होणारा त्रास नियंत्रणात आणण्यासाठी करण्याची आसने खालील प्रमाणे
अ) वक्रासन: वक्रासन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतील. आणि पाठ आणि कमरेच जे दुखणं आहे. ते एकदम कमी होईल.
असे करा वक्रासन
१) दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून ताठ बसा.
२) उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या बाहेरील बाजूस ठेवा आता डावा पायही दुमडा.
३) हळूहळू डावा हात उचलून तो उजव्या पायाच्या घोट्याजवळ ठेवा. त्यानंतर तुमचा खांदा, मान मागे वळवून हात कंबरेत घाला.
ब) मर्जरासान : हे आसन जर नियमित केले. तर मासिक पाळी संबधी सर्व तक्रारी दूर होतील. आणि तुम्हाला आराम मिळेल.
असे करा मर्जरासान
१) मर्जरासन करण्यासाठी गुडघ्यावर जमिनिवर बसा.
२) आपले दोन्ही हात पुढे करा. हात आणि गुडघे एका सरळ रेषेमध्ये आणा.
३) तुमचे गुडघे एकत्र आणि त्यामध्ये थोडे अंतर ठेवा.
४) श्वास घ्या आणि आपला चेहरा बाहेरच्या बाजूस घेऊन या.
५) आता श्वास सोडा आणि तुमची हनुवटी छातीच्या दिशेला घेऊन जा. असं कमीत कमी 10 वेळा करा.