पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाढते वजन हि सध्या खूप मोठी समस्या होऊन बसली आहे. अगदी ५ वर्षाच्या मुलापासून ते प्रौढ व्यक्ती पर्यंत सर्वांची हि एकच समस्या आहे. कारण धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाच आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे अनेकांचे वजन वाढत चालले आहे. त्यामुळं या समस्येवर उपाय म्हणून अनेकजण डायट प्लॅन बनवत आहेत. त्यामुळे तुम्ही डायट प्लॅन बनवत असाल तर खालील टिप्स वापरा.
१) आपण डायट प्लॅन केल्यामुळे कमी नाष्टा करतो. परंतु आपण जरी डायट करत असलो तरी आपल्याला सकाळच्या हेल्दी नाष्ट्याची सक्त गरज असते. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही पोटभर नाष्टा करा.
२) तुम्हाला जर फिट व्हायचे असेल तर वजन कमी करावे लागेल. त्यामुळे प्रोटीन युक्त पदार्थ खा जेणेकरून वजनही कमी होईल. आणि तुम्ही कमजोरही होणार नाहीत. सकाळी नाष्टा केला कि दिवसभर जेवण नसले तरी जमत.
३) तुम्ही सकाळी कार्बोहायड्रेड्स आणि फायबर आणि प्रोटीन युक्त नाष्टा केला. तर दिवसभर भूक लागत नाही त्यामुळे तुम्ही दिवसभरात आपल्या समोर असलेल्या पदार्थांचं सेवन करत नाहीत. आणि तुमचा डायट प्लॅनही सक्सेस होतो.
४) महिलांना दिवसभर काही ना काही खायची सवय असते. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. परंतु त्यांनी जर सकाळी प्रोटीन युक्त नाष्टा केला तर दिवसभर काही न खाता त्या राहू शकतात.
५) तुमच्या डायट प्लॅनमध्ये प्लॅनमध्ये दुधाचा समावेश करा. कारण दूध जर पिले त्यानेही खूप वेळ भूक लागत नाही. अशाप्रकारचा जर तुमचा डायट प्लॅन असेल तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकत.