आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्या महिला कमी वयाच्या दिसतात त्यांचा रक्तदाब कमी असतो. त्यामुळे त्यांच्या त्वचेवर वयाचा विपरित परिणाम होत नाही. तसेच या महिलांच्या शरीरात रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे प्रत्यक्ष वयाच्या तुलनेत कमी वयाच्या दिसणाऱ्या महिलांचे आयुष्य सर्वसाधारण महिलांच्या तुलनेत जास्त असू शकते, असा निष्कर्ष युनीलिव्हरच्या एका संशोधनातून काढण्यात आला आहे. आरोग्याशी संबंधित अशा आणखी काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
असेही काही रंजक शोध…
१) तिखट रस्सा खाल्याने सर्दीत आराम मिळतो असा अनेकांचा अनुभव असतो. मात्र, आता यास शास्त्रीय आधारही मिळाला आहे. कार्डिफ विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार, तिखट मद्रास करी खाल्यास गळ्यातील त्रास कमी होतो. औषधांसोबत काही प्रमाणात मसालेदार भाजी आणि रस्सा खाल्यास सर्दीपासून लवकर दिलासा मिळू शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
२) डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, गर्भवती महिलांनी रोज एक पेला दूध पिल्यास बाळाची उंची वाढते. ज्या महिलांनी गर्भावस्थेत १५० मिली दूध रोज घेतले, त्याच्या बाळांची उंची दूध न पिणाऱ्या महिलांच्या बाळांच्या तुलनेत जास्त होती, असे या संशोधनात शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
३) असाच आणखी एक मानवी शरीराशी संबंधित रंजक शोध म्हणजे भुकेचा संबंध पोटापेक्षा मेंदूसोबत जास्त असतो, असे संशोधकांना आढळून आले आहे. जेवल्यानंतर काही तासांत लोकांना भूक आणि जेवणाचे प्रमाण लक्षात राहत नाही. जेवणाबाबत स्मरणशक्ती चांगली असणारांना भुकेची जाणीव कमी होते. असे लोक कमी जेवतात. यासंबंधी प्रयोग करण्यासाठी संशोधकांनी काही लोकांना जबरदस्त कॅलरीज असल्याचे सांगून एक विशेष पेय दिले. त्या लोकांना पोट भरलेले जाणवले. परंतु, प्रत्यक्षात ते कमी कॅलरीचे पेय होते, असे मनोविकार तज्ज्ञ प्रा. जेफरी ब्रून्सटॉर्म यांनी म्हटले आहे.
४) तणावमुक्ती हवी असल्यास एका शांत आणि उत्तम श्रोता असलेल्या व्यक्तीला मनातील गोष्टी सांगाव्यात. यामुळे तणाव लकवर कमी होतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे. तसेच अशा व्यक्तीकडून चांगला सल्लाही मिळतो. तणावाच्यावेळी अशी व्यक्ती सापडणे अवघड असल्याने सोशल नेटवर्क चांगले ठेवावे. एखादा जवळच्या मित्राशी फोनवरुन अथवा प्रत्यक्ष भेटून बोलता येतील असे संबंध ठेवावेत.
५) आरोग्याशी संबंधित आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे हात स्वच्छ धुण्यामुळे चांगल्या आरोग्यासोबतच सकारत्मक उर्जाही मिळते, असा निष्कर्ष संशोधकांनी एका प्रयोगातून काढला आहे. हात धुण्याच्या सवयीमुळे काम करण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळू शकते. कोणत्याही कामानंतर हात धुतल्यास संबंधित व्यक्ती पुढच्या वेळेस तेच काम अधिक चांगल्या पद्धतीने करु शकते, असे हे संशोधन करणारे संशोधक म्हणतात.
६) आपल्या शरीराशी संबंधित अशीच एक रंजक बाब म्हणजे आपल्या हृदयाचे दिवसातून तब्बल एक लाख वेळा स्पंदन होते. याबाबत अनेकांना माहितीदेखील नसते. सर्वसामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात ७२ वेळा स्पंदन करते. या हिशोबाने दिवसभरात एक लाख स्पंदने होतात. हृदय शरिरात दररोज दोन हजार लिटर रक्त प्रवाहित करते. म्हणजेच एका मिनिटात ५ ते ३० लिटर रक्त प्रवाहित होते. हृदय स्वतः इलेक्ट्रीकल पल्स तयार करते. त्यामुळे शरिरापासून वेगळे झाल्यानंतरही हृदयाची स्पंदने सुरु राहतात.
‘हार्ट अॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा
तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे
‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे
पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले
कडूलिंबाच्या पानांचा हा फेसपॅक तुमचे सौंदय आणखी वाढवेल
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा
पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी
काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते
मेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक
‘आयंगर योगा’ करा आणि तणावमुक्त व्हा, आणखीही आहेत फायदे