आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मच्छर हा कुणाच्या मनोरंजनाचा विषय नक्कीच होऊ शकत नाही. कारण याच्यापासून उपद्रवच जास्त होतो. मच्छरमुळे अनेक आजार होतात. कधीकधी हे आजार जीवघेणेसुद्धा ठरतात. म्हणूनच मच्छर पळविण्याची अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध असतात. मच्छरबाबत काही रंजक माहिती अनेक प्रयोगातून वेळोवेळी पुढे आली आहे. ही माहिती आपण जाणून घेणार आहोत.
ही आहे खास माहिती
1 प्रत्येक वर्षी डेंग्यू आणि मलेरियासारख्या मच्छरांमुळे होत असलेल्या आजारांमुळे देशभरात हजारो लोक मरण पावतात.
2 मलेरियामुळे जगभरात प्रतिवर्षी 10 लाख लोक मरण पावतात.
3 आफ्रिकेमधील देशांमध्ये मच्छर चावल्याने होत असलेल्या आजारांमुळे सर्वात जास्त लोकांचे प्राण जातात.
4 एक मच्छर एकावेळी 0.1 मिलीलीटर रक्त शोषून घेतो.
5 मादी मच्छरचे आयुष्य हे नर मच्छरच्या आयुष्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 2 महिने असते.
6 मच्छर आपल्या वजनापेक्षा तीन पटींनी जास्त रक्त एकावेळी शोषून घेतात.
Visit : arogyanama.com