आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिला आपल्या केसांची खूप काळजी घेताना दिसतात. शिवाय पुरूष देखील आपल्या केसांच्या आरोग्याकडे आवर्जून लक्ष देतात. परंतु, केसांच्या अरोग्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टसमुळे अनेकदा फसवणूक होते. केस शायनी आणि सिल्की बनविण्याच्या प्रयत्नात केसांचे नुकसान होण्याची भीती असते. यासाठी घरगुती कंडीशनर तयार करून त्याचा वापर केसांसाठी केला तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. घरगुती कंडीशनर्स कसे बनवायचे आणि त्यांचा कोणता फायदा होतो याची माहिती आपण आज घेवूयात.
चहापत्तीचे पाणी उकळवून ते थंड झाल्यानंतर या पानाने केसांच्या मुळाशी मॉलिश करावे. एक तासानंतर केस धुवून टाकावे. यामुळे केस चमकदार होतात. तसेच शॅम्पूने केस धूतल्यानंतर बियरचे काही थेंब केसात टाकून अलगद मॉलिश करावे. थोडावेळाने केस धूवून टाकावेत. कडीपत्त्यातील व्हिटॅमिन बी केसगळती थांबविण्यासाठी उपयोगी आहे. केस चमकदार करण्यासाठी शॅम्पू लावण्यापूर्वी केसांना दही लावावे. नाराळाच्या तेलात लिंबू, शिकेकाई, तुळसपाने, आवळ्याची पाने टाकून उकळवावे. या तेलाने केसांची मॉलिश करावी.