आरोग्यनामा ऑनलाइन टीम : रात्री बिछाण्यावर पडल्यानंतर तोबडतोब कुणीही झोपी जात नाही. पुरूष असो की महिला, प्रत्येकजण बिछाण्यावर पडल्या पडल्या काही तरी विचार करतात. मात्र, महिला रात्री बिछाण्यावर पडल्यानंतर कोणता विचार करत असतील ? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. घर,ऑफिस असे दिवसभर काम केल्यानंतर महिला थकलेल्या असतात. झोपायच्या वेळी त्या दिवसभर झालेल्या गोष्टींचा विचार करतात. दिवसभर आपण काय केले, किंवा भविष्यातील काल्पनिक विश्वात त्या रमतात आणि झोपी जातात.
महिला रात्री झोपण्याआधी ज्या पाच गोष्टींचा विचार करतात त्या आपण जाणून घेणार आहोत. रात्री बिछाण्यावर पडल्यानंतर महिला आपल्या पेक्षा जास्त सुंदर दिसणाऱ्या महिलेचा विचार करू शकतात. तसेच उद्या आपण कोणता ड्रेस घालणार आहोत कोणी आपले कौतुक कुणी करेल की नाही या विश्वात त्या रमू शकतात. करिअर, पगार, भविष्याचं नियोजनाचा याचाही त्या विचार करतात. जोडीदाराचे विचार, त्याच्या बरोबर दिवसभर केलेल्या गप्पा, भांडणाचा विचार महिला बिछाण्यावर पडल्यानंतर करतात. आपली स्टाईल कशा प्रकारे बदलता येईल, असाही विचार त्या करू शकतात.