आरोग्यनामा ऑनलाइन – खोकला, सर्दी आणि ताप ही लक्षणे इन्फ्लूएंजा व्हायरसची लागण झाल्यास दिसून येतात. हे वायरस शरीरात नाक, डोळे आणि तोंडाद्वारे प्रवेश करतात. तसेच पीडित व्यक्ती खोकणे तसेच शिकल्यामुळे इतर व्यक्तींनाही याची लागण होते. वेळीच उपचार न केल्यास या वायरसमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. यासाठी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. इन्फ्लूएंजा वायरसमुळे निमोनिया, कानाच्या समस्या, सायनसचा त्रास होतो.
इन्फ्लूएंजा वायरसचा संसर्ग झाल्याने थकवा जाणवतो. शरीर अस्वस्थ, कमजोर झाल्यासारखे वाटते. थोडे काम केल्यास, चालल्यास चक्कर येते. थंडी वाजण्यासोबतच तापही येतो. ताप कमी किंवा जास्त असू शकतो. वायरस वाढल्यानंतर तापही वाढतो. गळ्यामध्ये कफ जमा झाल्याने खाताना आणि गिळताना त्रास होतो. तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होतो. शिंका येतात. या वायरसच्या संसर्गामुळे डोकेदुखी सुरू होते. स्नायूंमध्येही वेदना होतात. त्वचा पिवळसर दिसू लागते.
या वायरसच्या संसर्गापासून बचाव करायचा असल्यास पेय पदार्थ घ्यावेत. तापामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारात जास्त पेय पदार्थांचा समावेश करावा. संसर्ग झालेल्या रूग्णाने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे कफ कमी होतो. तसेच वाफ घेतल्याने श्वास घेताना होणारा त्रास कमी होतो. ओवा पाण्यामध्ये एकत्र करून उकळून घ्या आणि ते पाणी प्या. तसेच साधे पाणीही उकळूनच पिणे गरजेचे असते.
इन्फ्लूएंजा वायरस इन्फेक्शन झाल्यावर सर्वात आधी स्वच्छतेवर लक्ष द्या. जेवण्याआधी हात धुवावेत तसेच शरीराला अधिकाधिक आराम द्यावा. इन्फ्लूएंजा वायरस इन्फेक्शन झाल्यानंतर शिळ्या अन्नपदार्थ खावू नयेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. ताप आल्यानंतर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीमध्ये होणाऱ्या वेदना, श्वास घेताना होणारा त्रास यांसारखी लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधवा.