संसर्गजन्य डिप्थीरिया मुलांसाठी घातक, वेळीच उपचार घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन – डिप्थीरिया हा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांना याचा संसर्ग पटकन होतो. मोठ्या माणसांनाही हा आजार होऊ शकतो. डिप्थीरिया कॉरीनेबॅक्टेरियम बॅक्टीरियाच्या संसर्गामुळे होतो. हे विषाणू प्रथम गळ्यामध्ये संसर्ग पसरवतात. श्वसननलिकेपर्यंत संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. याची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्याने हा रोग पसरतो. हा आजार योग्यवेळी उपचार न घेतल्यास शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
डिप्थीरियाचे जीवाणु तोड, नाक आणि गळ्यामध्ये संसर्ग करतात. डिप्थीरियाचे संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे सहज होते. पावसाळ्यामध्ये डिप्थीरिया सर्वात जास्त त्रासदायक ठरतो. या काळात हे विषाणू वेगाने पसरतात. डिप्थीरियाची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे. डिप्थीरियाची लक्षणे संक्रमण झाल्यानंतर दोन ते पाच दिवसांमध्ये दिसून येतात. तसेच यामुळे त्वचेचा रंग निळसर दिसू लागतो. डिप्थीरियाची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. याव्यतिरिक्त गळ्यामध्ये सूज येणे, वेदना होणे असा त्रास होतो. डिप्थीरियाची लागण झाल्यानंतर ताप येतो. तसचे अस्वस्थता जाणवते. सतत खोकला येतो. डिप्थीरियाची लागण झालेल्या रूग्णाला हातावर अॅन्टी-टॉक्सिन्सचे इन्जेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर अॅन्टी-एलर्जीची टेस्ट करतात. सुरूवातीय अॅन्टी-टॉक्सिन्स कमी प्रमाणात दिले जाते. हळूहळू याचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवले जाऊ शकते. मुलांना नियमितपणे लसीकरण केल्यामुळे डिप्थीरियाचा धोकाही कमी होतो.