उपवास केल्यामुळे वाढते आयुष्य, गंभीर रोगांचा धोका होतो कमी
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उपवास म्हणजे अंधश्रद्धा आहे, उपवास केल्याने पचनव्यवस्था चांगली होते, अशी विविध मते मांडली जातात. तर काही जण देवावरील श्रद्धपोटी उपवास करतात. अशाप्रकारे उपवास या विषयावर तीन प्रकारे विचार मांडले जातात. सर्व धर्मांत उपवासाचा देवाशी संबंध जोडला आहे. मात्र, वैज्ञानिक पैलू देखील उपवासाला असल्याचे दिसून आले आहे. उपवास केल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार टाळता येतात, असे मत काही संशोधकांनी मांडले आहे.
उपवासावर संशोधन
उपवास हा प्रकार जगभरात आढळून येतो, मात्र त्यामागील कारणे आणि श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. उपवास हा श्रद्धेतूनच केला जात असल्याचे दिसून येते. पण विज्ञान मात्र उपवासाकडे रोगांविरुद्ध प्रभावी शस्त्र म्हणून पाहत आहेत. जर्मनीच्या डीजेडएनई आणि हेल्महोल्ज सेंटर या दोन प्रसिद्ध विद्यापीठांनी केलेल्या एक शोधात उपवासासंबंधी विविध माहिती समोर आली आहे. हे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदरांचे दोन गट बनवले. एका गटाला उपवास घडवला तर दुसऱ्याला नाही. यानंतर जे तथ्य समोर आले ते आश्चर्यचकित करणारे होते. ज्या उंदरांना उपवास घडवला त्यांचे आयुष्य पाच टक्के वाढले.
कर्करोग होत नाही
उंदरांचा मृत्यू हा बहुतांश वेळा कर्करोगाने होतो. शास्त्रज्ञांनी कँसर पीडित उंदरांचे दोन गट बनवले होते. एका गटाला उपवास घडवला तर खाऊ पिऊ घातले. उपाशी राहिलेल्या उंदरांच्या शरीरातील कँसरच्या पेशींची वाढ मंद गतीने झाली. उपवास करणारे उंदीर ९०८ दिवस जिवंत राहिले. तर सतत खात असलेले उंदीर ८०६ दिवस जगू शकले, असे आढळून आले.
उपवास औषधाप्रमाणे
उपवासामुळे आयुष्य वाढतो. मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. पण उपवासाचा वृद्धापकाळात फायदा होत नाही. वृद्धापकाळातील अडचणी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वृद्धापकाळात शरीराची सक्रियता कमी होते. पाहण्याची आणि ऐकण्याची शक्ती दुर्बल होते. चालण्याची गती कमी होते. शास्त्रज्ञांनी वृद्धापकाळाशी निगडीत २०० अडचणींवर लक्ष दिले. यामध्ये वृद्धापकाळात उपवासाचा काहीच परिणाम झालेला दिसला नाही.
नवीन पेशी
सुरुवातील उपवास करताना शरीराला त्रास होतो. पण वेळेनुसार उपाशी पोटी राहण्याची सवय होते. १२ तास काहीच न खाल्लेल्या लोकांच्या शरीरात ऑटोफागी नावाची सफाईची प्रक्रिया सुरु होते. निष्क्रिय झालेल्या पेशींना शरीर आपोआप साफ करण्यास सुरुवात करते. भूख आणि उपवासामुळे नवीन पेशी निर्माण करण्यास उपयुक्त ठरते.
Comments are closed.